भोकरदनमध्ये दोन व्यासपीठांवरून बाप्पांना निरोप

By Admin | Updated: September 29, 2015 00:43 IST2015-09-29T00:29:23+5:302015-09-29T00:43:06+5:30

भोकरदन : शहरात गणरायाच्या जयघोषात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. मात्र, पोलिस ठाण्यासमोर दोन वेगवेगळे व्यासपीठ उभारल्याने या व्यासपीठाची जोरदार चर्चा सुरू आहे़

In Bhokardan, from two platforms, sends greetings to the parents | भोकरदनमध्ये दोन व्यासपीठांवरून बाप्पांना निरोप

भोकरदनमध्ये दोन व्यासपीठांवरून बाप्पांना निरोप


भोकरदन : शहरात गणरायाच्या जयघोषात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. मात्र, पोलिस ठाण्यासमोर दोन वेगवेगळे व्यासपीठ उभारल्याने या व्यासपीठाची जोरदार चर्चा सुरू आहे़
शहरामध्ये २८ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी नवे बहुताश गणेश मंडळानी मुख्य मिरवणुकीऐवजी थेट केळना नदी पात्रात गणेशाचे विसर्जन केले, तर सांंयकाळी ५ च्या दरम्यान डॉ हेगडेवार चौकात छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या मूर्तीची तहसीलदार मुकेश कांबळे, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या हास्ते पुजा करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर रात्री १० वाजता आ. संतोष दानवे, राजाभाऊ देशमुख, आदींच्या हास्ते महाआरती होऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत आ. संतोष पाटील दानवे, माजी आ़ चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.हर्षकुमार जाधव, चंद्रकांत पगारे यांच्यासह शहरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
मिरवणुकीसाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता़
भोकरदन शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील मुस्लीम बांधव सुध्दा मोठ्या हिरारीने सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: In Bhokardan, from two platforms, sends greetings to the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.