भोकरदन घरफोडी; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: July 16, 2016 01:07 IST2016-07-16T00:55:15+5:302016-07-16T01:07:40+5:30

जालना/भोकरदन : भोकरदन येथील सराफा व्यापारी मनोज दुसाने यांच्या घरातून चोरीस गेलेला साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले

Bhokardan Burglar; Seven lakhs worth of money seized | भोकरदन घरफोडी; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

भोकरदन घरफोडी; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त


जालना/भोकरदन : भोकरदन येथील सराफा व्यापारी मनोज दुसाने यांच्या घरातून चोरीस गेलेला साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच संशयितांनी चोरी केल्याचे कबूल केले.यामध्ये ७ लाख ४९ हजार १०० रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
११ जुलै रोजी सायंकाळी घराची कडी तोडून घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला होता. पोलिसांनी नांजा येथील गणपत दिगंबर मोरे, भोकरदन शहरातील अजीम करीम पठाण या दोघांना गुरूवारी संशयावरून भोकरदन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चोरीची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले आणि चोरी केल्याची त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Bhokardan Burglar; Seven lakhs worth of money seized