भोकर तालुक्यात तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:19 IST2017-09-17T00:19:30+5:302017-09-17T00:19:30+5:30
वातावरण बदलामुळे तालुक्यात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. मात्र येथे इंजेक्शनचा व डेंग्यू तपासणी कीटचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे.

भोकर तालुक्यात तापाची साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : वातावरण बदलामुळे तालुक्यात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. मात्र येथे इंजेक्शनचा व डेंग्यू तपासणी कीटचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे.
मागील काही दिवसांपासून पाऊस, ऊन आणि वाढत्या उकाड्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांत वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालय व खाजगी रूग्णालयात उपचारासाठी रुग्णांच्या रांगा लागत आहेत. सुरुवातीस साधारण असलेला ताप टायफॉईड, डेंग्यूचा असू शकतो अशी भीती रुग्णांना वाटत असल्याने ग्रामीण रुग्णालयात आलेले रुग्ण तपासणी करण्याचा अट्टाहास धरीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू तपासणीची कीट व टायफॉईडचे इंजेक्शनसुद्धा उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.