दातृत्त्वाच्या झऱ्यात भागली गावची तहान
By Admin | Updated: May 23, 2015 00:39 IST2015-05-23T00:28:10+5:302015-05-23T00:39:32+5:30
संजय फुलारी ,लामजना उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत़ औसा तालुक्यातील लामजना गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने

दातृत्त्वाच्या झऱ्यात भागली गावची तहान
संजय फुलारी ,लामजना
उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत़ औसा तालुक्यातील लामजना गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने माजी सरपंच नंदलाल बिदादा यांनी स्वखर्चातून विंधन विहिर घेतली आहे़ सुदैवाने त्यास चांगले पाणी लागले असून, त्यांनी ही विंधन विहिर गावकऱ्यांसाठी खुली करून दिली आहे़ त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी धावाधाव थांबली आहे़
गेल्या पावसाळ्यात औसा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला़ गेल्या दोन महिन्यांपासून लामजना गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ गावातील नागरिकांची पाण्याची अडचण दूर व्हावी म्हणून माजी सरपंच नंदलाल बिदादा यांनी घरातील कूपनलिका खुली करून दिली होती़ नागरिक त्याचा वापर करीत होते़ परंतू, गेल्या दोन आठवड्यापूर्वी अचानक या विंधन विहिरीचे पाणी कमी झाले़ त्यामुळे नागरिकांची अडचण होऊ लागली़ हे पाहून बिदादा यांनी स्वखर्चातून आपल्या घराच्या परिसरात विंधन विहिर घेतली आहे़ त्यास चांगले पाणी लागल्याने नागरिकांची तहान भागू लागली आहे़