शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

औरंगाबादेत भाकपचा विभागीय मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:48 IST

आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भाकपचा विभागीय मोर्चा भर उन्हातच विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकºयांच्या हातात पक्षाचा विळा-कणीस निशाणीचा लालबावटा होता व ते उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते.

ठळक मुद्देमोर्चेकऱ्यांच्या हातात लालबावटा : महिलांचा लक्षणीय सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भाकपचा विभागीय मोर्चा भर उन्हातच विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकºयांच्या हातात पक्षाचा विळा-कणीस निशाणीचा लालबावटा होता व ते उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते. महिलांचा लक्षणीय सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांतून मोर्चेकरी आले होते.रणरणत्या उन्हात दुपारी १.३० च्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. लालबावट्यांमुळे मोर्चा लक्ष वेधून घेत होता. नूतन कॉलनी, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक मार्गे हा मोर्चा दुपारी ३.३० च्या सुमारास विभागीय आयुक्तांच्या कार्यालयावर धडकला. तेथे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. मनोहर टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा झाली.सभेत भाकपचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, राष्टÑीय कार्यकारिणी सदस्य कॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. देवीदास जिगे (जालना) व जोतिराम हुरकडे (बीड) यांची घणाघाती भाषणे झाली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना एका शिष्टमंडळाने आपले सविस्तर निवेदन सादर केले. मोर्चात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कष्टकरी, गायरानधारक, वनजमीनधारक, आदिवासी, भिल्ल, नाथजोगी, रोहयो मजूर, अंगणवाडी- आशा- पार्ट टायमर- रोजगार सेवक, अंबड नगर परिषदेचे सफाई कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, मोलकरीण,फेरीवाले, असंघटित कामगार, भूमिहीन, महिला, विद्यार्थी, युवक आदींचा सहभाग राहिला.कॉ. अश्फाक सलामी, कॉ. शिवाजी फुलवाले, कॉ. भास्कर लहाने, कॉ. माधुरी क्षीरसागर, पंकज चव्हाण, भाऊ प्रभाळे, रशीद पठाण, अशोक जाधव, कैलास कांबळे, विलास शेंगुळे, कॉ. गणेश कसबे,भाऊसाहेब शिंदे, काकासाहेब निघोटे, भाऊसाहेब रोठे, कॉ. तारा बनसोडे, माया भिवसाने, अनिता हिवाळे, मनीषा भोळे, रतन अंबिलवादे, महेबूब कुरेशी, कॉ. सरिता जिगे, आलमनूर शेख, रंजना राठोड, कॉ. भगवान भोजने, कॉ. बुद्धप्रिय कबीर आदींनी मोर्चासाठी परिश्रम घेतले.मोर्चेकºयांच्या मागण्या अशा...शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, मनरेगांतर्गत कामे सुरूकरा, बेघरांना घरे द्या,घरांसाठी जमीन द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकºयांना न्याय द्या, गारपीट, बोंडअळीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई द्या, असंघटित कामगारांना किमान वेतन १८ हजार रु. करा, सर्वांना समान शिक्षण द्या, भूमिहीनांना जमीन द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, शेतकºयांना पुरेसा वीजपुरवठा करा.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया