भरदिवसा घरफोडी; एक लाखाचा ऐवज लंपास
By Admin | Updated: April 28, 2015 00:28 IST2015-04-28T00:14:22+5:302015-04-28T00:28:05+5:30
जालना : जुना जालन्यातील अयोध्यानगर भागात अंगणवाडी मदतनीस कमल नवनाथ कराड (३४) यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ९ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

भरदिवसा घरफोडी; एक लाखाचा ऐवज लंपास
जालना : जुना जालन्यातील अयोध्यानगर भागात अंगणवाडी मदतनीस कमल नवनाथ कराड (३४) यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ९ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला. यात सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कमेचा समावेश आहे. ही घटना सकाळी १० ते १२ च्या दरम्यान घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कमल कराड ह्या नूतन वसाहत भागातील अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करतात. सकाळी ड्युटीवर जाताना नजरचुकीने त्यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा राहिला. हीच संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा वरील किमतीचा ऐवज घेऊन तेथून पोबारा केला. दुपारी घरी आल्यानंतर कराड यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ कदीम जालना पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकाराची फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी.पी. सानप हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार एम.यू. पठाण यांनी दिली.