शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Bharat Bandh : खुलताबाद येथे आंदोलकांनी वाहनधारकांना केले चॉकलेटचे वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 6:07 PM

कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेंस व मनसेच्या पदाधिका-यांनी आज सकाळी इंधन दर वाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने केली.

खुलताबाद (औरंगाबाद ) : कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेंस व मनसेच्या पदाधिका-यांनी आज सकाळी इंधन दर वाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने केली. यावेळी इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना आंदोलकांनी 'चॉकलेट'चे वाटप केले. बंदला तालुक्यातील गल्लेबोरगाव, सुलतानपुर, काटशिवरीफाटा, गदाणा य़ा ठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठींबा दिला. तर तालुक्यात उर्वरित ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. 

जबर इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनता पुरती हैरान झाल्याने कॉग्रेंस, राष्ट्रवादी कॉग्रेंस व मनसे नी पुकारलेल्या बंद ला खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, गदाणा, सुलतानपूर, काटशिवरी फाटा,या ठिकाणी  कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत येथील दुकाने शंभर टक्के बंद होती. त्यानंतर हळुहळु व्यवहार सुरू झाली. तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे जगन्नाथ खोसरे, शोभाताई खोसरे, उपसरपंच संजय भागवत ,तुकाराम हार्दे यांच्या नेतृत्वाखाली कन्नड रोडवरील पेट्रोल पंपावर निदर्शने करून सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

तालुक्यातील फुलंब्री रोडवरील काटशिवरीफाटा, सुलतानपुर येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणा-या वाहनधारकांना कॉग्रेंसचे तालुकाध्यक्ष अनिल पा.श्रीखंडे, राष्ट्रवादी कॉग्रेंसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास चव्हाण, तालुकाध्यक्ष शंकरकाका आधाने, खुलताबादचे नगराध्यक्ष अँड. एस.एम. कमर, शहराध्यक्ष अब्दूल समद टेलर, आबेद जहागीरदार, माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी, रा.कॉ.जिल्हाउपाध्यक्ष दिनेश सावजी,  कॉग्रेंस सेवादलाचे तालुकाध्यक्ष नीलेश पवार, माजी सभापती सुरेश चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती अनिल चव्हाण, सुदाम चव्हाण, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय होळकर,  सुलतानपुरचे  उपसरपंच वसंत चव्हाण, मिठ्ठू महालकर, बाळकृष्ण दांडेकर, खंडू खंडागळे, कय्यूम पटेल, प्रभाकर देवकर, परभत भांडे, सुरेश जाधव, विनोद जाधव, रमेश करपे, कैलास हरणे, भास्कर मोठे, आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक हजर होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली  .

बाजार सांवगी येथे कॉग्रेंस पक्षाचे वसंतराव नलावडे चांदखॉ पठाण,  प्रविण निकम यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. यावेळी पोहेकॉ संजय जगताप यांना निवेदन देण्यात आले. खुलताबाद शहरात बंदला कुठलाही फरक पडला नाही सर्व व्यवहार सुरळीत सुरू होती. सकाळपासूनच सर्व दुकानदारांनी आपला कारभार सुरू केला होता. एकदंरीत तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFuel Hikeइंधन दरवाढAurangabadऔरंगाबाद