भरारी पथकाने पकडले साडेनऊ लाख

By Admin | Updated: September 17, 2014 00:26 IST2014-09-17T00:24:12+5:302014-09-17T00:26:19+5:30

नांदेड : शहरातील वाजेगाव पोलिस चौकीजवळ निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने एका गाडीची तपासणी केली

Bharari squad caught up to nine lakhs | भरारी पथकाने पकडले साडेनऊ लाख

भरारी पथकाने पकडले साडेनऊ लाख

नांदेड : शहरातील वाजेगाव पोलिस चौकीजवळ निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने एका गाडीची तपासणी केली असता, साडेनऊ लाखांची रोकड सापडली़ कारमधील दोघांकडे चौकशी केली असता, त्यांना मात्र याबाबतचे पुरावे देता आले नाही़ त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे़
लोकसभा निवडणुकीच्या काळात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम घेवून जात असताना, त्याचे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक करण्यात आले होते़ या निर्णयामुळे राज्यभरात भरारी पथकांच्या हाती कोट्यवधी रुपयांची रोकड लागली़
मतदारांना आमिष दाखविण्यासाठी नेण्यात येणारे हे पैसे भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने पकडले होते़ त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या मुक्त वापराला निर्बंध लागावेत म्हणून भरारी पथकांची स्थापना करण्यात आली़ सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या भरारी पथकाने मंगळवारी वाजेगाव चौकीजवळ बीड जिल्ह्यातील परळी येथून येणाऱ्या टाटा व्हिस्टा एम़एच़४४, जी़४९६ या गाडीची तपासणी केली़ यावेळी कारमध्ये दोघे जण होते़ यावेळी चौकशी केली असता, त्यांनी सदरील पैसे हे फायनान्स कंपनीमध्ये भरण्यासाठी आणल्याचा खुलासा केला़ परंतु त्याबाबत त्यांच्याकडे कोणतेच पुरावे आढळले नाही़ त्यामुळे भरारी पथकाने सदरील रक्कम जप्त करुन पुरावे आणण्यासाठी मुदत दिल्याची माहिती हाती आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Bharari squad caught up to nine lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.