भरारी पथकाने १ लाख पकडले
By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-06T00:02:49+5:302014-10-06T00:13:54+5:30
औराद शहाजानी : औसा मतदारसंघातील कलमुगळी या गावानजीक निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रविवारी दुपारी वाहन तपासणी १ लाख रूपये जप्त केले आहे़

भरारी पथकाने १ लाख पकडले
औराद शहाजानी : औसा मतदारसंघातील कलमुगळी या गावानजीक निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रविवारी दुपारी वाहन तपासणी १ लाख रूपये जप्त केले आहे़ ही रक्कम औराद शहाजानी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे़
निलंगा तालुक्यातील कलमुगळी येथे वाहनांची भरारी पथकाकडून तपासणी करण्यात येत होती़ मंडळाधिकारी जी़आरख़ुर्दे, पोहेकॉ़ एम़पी़चव्हाण, पोकॉ़ बालाजी जाधव, अनिल गोरे यांच्या भरारी पथकाने माळेगावहून कलमुगळीकडे जाणाऱ्या कारची (क्ऱ एम़एच़०४, बी़डी़ ५४५९) रविवारी तपासणी केली़ तेव्हा वाहनातील हिराचंद जाधव (रा़नेलवाड) यांच्याकडे १ लाख रूपये आढळून आले़ ही रक्कम जप्त करण्यात आली़ याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस अधिक तपास करीत आहेत़ (वार्ताहर)