भारिप-बमसं जिल्हाध्यक्षपदी भिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 23:17 IST2016-01-16T23:14:35+5:302016-01-16T23:17:15+5:30
कनेरगाव नाका : गौतमराव भिसे यांची भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

भारिप-बमसं जिल्हाध्यक्षपदी भिसे
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका येथील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गौतमराव भिसे यांची भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
ही निवड प्रदेश सचिव तथा पक्षनिरीक्षक डी. एन. खंदारे यांच्या हस्ते झाली. याबद्दल श्रीरंग सिरसाठ, अॅड. सुधाकर खंदारे, अॅड. धम्मदीपक खंदारे, अशोक कांबळे, दिवकार पुंडगे, प्रकाश राऊत, सीताराम इंगोले, भुजबळ, रवी वाढे, इमाम भाई, अतीक शेख, विजय पठाडे, सुभाष मोरे, भारत पठाडे, सदाशिव पठाडे, अशोक खंदारे, प्रकाश जोगदंड, अशोक सिरसाठ, अॅड. एम. एम. मोरे आदींनी सत्कार केला. तसेच भिसे यांना पुढील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात निर्देशित केले.
बैठकीस सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत येथील आजी- माजी कार्यकर्ते तर कनेरगावनाका येथे विजयकुमार पठाडे, नाना विसावे, सूर्यवंशी, सुभाष पठाडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)