भाजपा जिल्हाध्यक्षपदी भांदरगे यांची फेरनिवड
By Admin | Updated: January 15, 2016 00:20 IST2016-01-15T00:00:10+5:302016-01-15T00:20:09+5:30
जालना : भाजपा जालना जिल्हा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पक्ष कार्यालयात गुरुवारी पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी रामेश्वर भांदरगे

भाजपा जिल्हाध्यक्षपदी भांदरगे यांची फेरनिवड
जालना : भाजपा जालना जिल्हा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पक्ष कार्यालयात गुरुवारी पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी रामेश्वर भांदरगे यांची फेरनिवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी आ. अतुल सावे यांनी काम पाहिले.
बैठकीस भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष पाटील दानवे, आ. नारायण कुचे, माजी आ. विलास खरात, माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव, राहुल लोणीकर, संजय राऊत, पं.स. सदस्य रावसाहेब भवर, जि.प. सदस्य रवींद्र राऊत, संतोष लोखंडे, कौतिकराव जगताप, रामलाल चव्हाण, मधुकर गाढे, कैलास गव्हाड, मुकेश चिने आदींची उपस्थिती होती.