भैय्यासाहेबांचे कार्य चळवळीसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:10+5:302020-12-17T04:26:10+5:30

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपूत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भडकल गेट येथे पीपल्स एज्युकेशन ...

Bhaiyasaheb's work is a guide for the movement | भैय्यासाहेबांचे कार्य चळवळीसाठी दिशादर्शक

भैय्यासाहेबांचे कार्य चळवळीसाठी दिशादर्शक

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपूत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भडकल गेट येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी- माजी विद्यार्थी, मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेयर असोसिएशन व आंबेडकरी अनुयायाच्या वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले

या प्रसंगी बोलताना चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावण गायकवाड म्हणाले, आंबेडकरी चळवळीत भैय्यासाहेबांनी नेतृत्वाच्या स्पर्धेत स्वतःला दूर ठेवत निष्ठेने बाबासाहेबांचे कार्य पुढे नेले. रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले; पण नेतृत्वाच्या हव्यासापोटी ऐक्य होऊ शकले नाही, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्धमय भारत निर्मितीच्या ध्येयामुळे त्यांनी राजकीय कामापेक्षा धम्म चळवळीचा प्रचार प्रसार केला.

यावेळी प्रा. डॉ. सुनील वाकेकर, रुपचंद गाडेकर, उत्तम पंडागळे, डॉ. संदीप जाधव, सय्यद तौफिक, सचिन निकम, प्रा.देवानंद पवार, मुकेश खोतकर, विजय वाहुळ, गुणरत्न सोनवणे, अ‍ॅड. अतुल कांबळे, भाई रत्नाकर खंडागळे, प्रकाश इंगळे, राहुल वडमारे, गणेश साळवे, मनोज शेजवळ, सतीश जाधव, राहुल खंडागळे आदींसह रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपाई (खरात), राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, पँथर विद्यार्थी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, भीमशक्ती, सम्यक विद्यार्थी आघाडी या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

फोटो कॅप्शन:-

सुर्यपूत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी.

Web Title: Bhaiyasaheb's work is a guide for the movement