भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

By Admin | Updated: April 3, 2015 00:40 IST2015-04-03T00:29:17+5:302015-04-03T00:40:27+5:30

लातूर : अहिंसेचे पुजारी, पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६१४ वी जयंती लातूर शहरात विविध धार्मिक कार्यक्रम

Bhagwan Mahavir Jayanti celebrated with enthusiasm | भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी


लातूर : अहिंसेचे पुजारी, पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६१४ वी जयंती लातूर शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधले़
सकल जैन समाजाच्या वतीने दिगंबर, श्वेतांबर जैन बांधव एकत्र येऊन दरवर्षी भगवान महावीरांची जयंती भक्तीभावाने व उत्साहात साजरी करतात. सकाळी ७ वाजता श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात जेष्ठ कार्यकर्ते रमेश रामढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ यानंतर सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांची पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली़ शोभायात्रेत उंट, बॅन्ड पथकाचा सहभाग होता़ जैन स्त्री-पुरूष, अबाल-वृध्द पारंपरिक वेशात सहभागी झाले होते़
ही शोभायात्रा देशपांडे गल्ली, सुभाष चौक, भुसार लाईन, गंजगोलाई, हनुमान चौक, चंद्रनगर भागातून फिरून वर्धमान उद्यानात विसर्जित झाली़
या शोभायात्रेत भगवान महावीर जयंती महोेत्सव स्वागताध्यक्ष तेजमल बोरा, दिगंबर जैन मंदीर विश्वस्त समितीचे अध्यक्ष राजीव बुबणे, वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष विष्णुदास पोकरणा यांच्यासह हसमुख भाई शहा,कमलाकांत सेठ , पारस चापसी, हेमंत बोरा, राजेश डुंगरवाल, ललितभाई शहा, कुमार चापसी, किशोर नाकिल आदी सहभागी झाले होते़ शोभायात्रेत सहभागी झालेले भगवान महावीरांचा जयघोष करीत होते़ ठिकठिकाणी जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती़

Web Title: Bhagwan Mahavir Jayanti celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.