भद्रा मारुती संस्थानतर्फे घाटीला १ लाखांचे इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:02 IST2021-05-07T04:02:16+5:302021-05-07T04:02:16+5:30
औरंगाबाद : धर्मादाय सहआयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खुलताबाद येथील भद्रा मारुती संस्थानने बुधवारी घाटी रुग्णालयाला एक लाख ...

भद्रा मारुती संस्थानतर्फे घाटीला १ लाखांचे इंजेक्शन
औरंगाबाद : धर्मादाय सहआयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खुलताबाद येथील भद्रा मारुती संस्थानने बुधवारी घाटी रुग्णालयाला एक लाख रुपयांचे दोन प्रकारचे इंजेक्शन दिले.
महामारीच्या संकटकाळात दानशूर व्यक्ती, संस्था यांनी समाजसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन धर्मदाय सहआयुक्त सुरेंद्र बियाणी यांनी केले होते. त्यास धार्मिक संस्था, दानशूर व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज भद्रा मारुती संस्थानतर्फे १ लाख रुपयांचे इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश हरबडे, डॉ. माधुरी कुलकर्णीं यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी धर्मादाय सहआयुक्त सुरेंद्र बियाणी, आ. अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मीठू पाटील बारगळ, दयाराम बसैये, राजेंद्र जोंधळे यांची उपस्थिती होती. तसेच रमेश मुळे यांनी जिल्हा रुग्णालयास पिण्याच्या पाण्याचे सयंत्र भेट दिले. यावेळी धर्मादाय निरीक्षक अजितसिंग पाटील यांची उपस्थिती होती.