अ. भा. टेबल टेनिस स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:53 IST2018-01-20T22:53:14+5:302018-01-20T22:53:37+5:30

सोलापूर येथे २३ जानेवारीपासून सुरू होणाºया आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ जाहीर झाला आहे.

A Bh University team announced for table tennis tournament | अ. भा. टेबल टेनिस स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ जाहीर

अ. भा. टेबल टेनिस स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ जाहीर

ठळक मुद्देसोलापूरला स्पर्धा : अंकिता, शैलेश भूषवणार कर्णधारपद

औरंगाबाद : सोलापूर येथे २३ जानेवारीपासून सुरू होणाºया आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी उद्या, रविवारी सोलापूरला रवाना होणार आहे. महिला संघाचे कर्णधारपद अंकिता मुचवड भूषवणार आहे. पुरुष संघाच्या नेतृत्वाची धुरा शैलेश बेंडसुरे याच्या खांद्यावर असणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याआधी संघाचे प्रशिक्षण शिबीर प्रशिक्षक कुलजितसिंग दरोगा यांनी घेतले आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणारा संघ (महिला) : अंकिता मुचवड (कर्णधार), स्वप्ना देशपांडे, अंजली पांचाल, दीपाली पट्टेकर, प्राची पवार. पुरुष संघ : शैलेश बेंडसुरे (कर्णधार), प्रसाद बुरांडे, रौनक बेंडसुरे, श्रीकांत व्यवहारे, महेश उजागरे, श्रीकांत व्यवहारे. प्रशिक्षक : कुलजितसिंग दरोगा. संघ व्यवस्थापक : राहुल चव्हाण.
या संघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, सुरेंद्र मोदी, मसूद हाश्मी, नितीन निरवणे, किरण शूरकांबळे, अभिजितसिंह दिख्खत, मनोज शेटे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: A Bh University team announced for table tennis tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.