चोख बंदोबस्तात ‘नीट- २’ सुरळीत
By Admin | Updated: July 25, 2016 01:08 IST2016-07-25T01:01:28+5:302016-07-25T01:08:46+5:30
औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ‘नीट-२’ साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले

चोख बंदोबस्तात ‘नीट- २’ सुरळीत
औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ‘नीट-२’ साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. औरंगाबादेतील १३ केंद्रांवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनीच रविवारी ही परीक्षा दिली.
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा झाली. गेल्या वर्षी हीच परीक्षा ‘प्री मेडिकल एंट्रन्स टेस्ट’ म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षाच रद्द केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘नॅशनल एंट्रन्स इलिजीबिलीटी टेस्ट’ अर्थात नीट-२ ही परीक्षा आज २४ जुलै रोजी औरंगाबादेतील १३ केंद्रांवर घेण्यात आली. मराठवाडा, खान्देश, विदर्भाचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील ५ हजार ९०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दिल्ली येथून ‘सीबीएसई’चे २८ अधिकारी रविवारी औरंगाबादेत तळ ठोकून होते.
/विद्यार्थ्यांची अडचण - वृत्त २ वर