कॅम्पसच्या आर्ट, क्राफ्ट स्पर्धेस उत्तम प्रतिसाद
By Admin | Updated: July 20, 2015 00:51 IST2015-07-20T00:26:25+5:302015-07-20T00:51:10+5:30
जालना : लोकमत कॅम्पस क्लब सदस्यांसाठी आर्ट व क्राफ्ट स्पर्धेचे आयोजन १९ जुलै ( रविवार) रोजी सकाळी १० वा. एम.एस.जैन इंग्लिश स्कूल व किड्स केंब्रीस स्कूल येथे करण्यात आले होते.

कॅम्पसच्या आर्ट, क्राफ्ट स्पर्धेस उत्तम प्रतिसाद
जालना : लोकमत कॅम्पस क्लब सदस्यांसाठी आर्ट व क्राफ्ट स्पर्धेचे आयोजन १९ जुलै ( रविवार) रोजी सकाळी १० वा. एम.एस.जैन इंग्लिश स्कूल व किड्स केंब्रीस स्कूल येथे करण्यात आले होते.
यात पहिली ते चौथी गटातील ग्रिटींग कार्ड, पाचवी ते सातवी मास्क मेकींग व आठवी ते दहावी गटासाठी पोस्टर मेकींग व पर्यावरण वाचवा हे स्पर्धेतील विषय होते. या परीक्षेत पंच म्हणून सारडा कंन्नम व प्रीती कुलकर्णी यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे : किडस् कॅम्बरेज इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विजेत्यांची नावे - प्रथम चिन्मय शिंदे, द्वितीय सिद्धी घोलप, तृतीय पूर्वी दायमा, पाचवी ते सातवी गट - प्रथम रूपल देशपांडे, द्वितीय गार्गी जाधव, तृतीय शीतल बापूसाहेब.
आठवी ते दहावी गट - प्रथम प्रतीक सोनार, द्वितीय प्रणिता भडांगे, तृतीय सृष्टी खरात. सूत्रसंचालन रीना निर्मल यांनी केले. विशेष सहकार्य संस्थेच्या संचालिका अलका गव्हाणे यांनी केले.
यावेळी पूनम दायमा, कविता नरवडे, सरोजनी काकडे, शितल भानडे, आशा चिरखे, दीपाली कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
एम.एस.जैन इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे : पहिली ते चौथी या गटात प्रथम मेहक अनिस सेठ, द्वितीय कृष्णा संदीप, तृतीय ऋषिकेष मंत्री, पाचवी ते आठवी प्रथम श्रावण गोले, द्वितीय प्रांजल मगरे, तृतीय प्रथा अग्रवाल, आठवी ते दहावी गटात अभिषेक कारेगावकर, द्वितीय कन्हैय्या अग्रवाल, तृतीय स्वरूपा भाले यांचा समावेश आहे. पंच म्हणून राम चौरे, पवन सरकटे यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याध्यापिका सारडा, गोयल यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी दोन्ही केंद्रांवर संस्थेचे पदाधिकारी, संचालक, शिक्षकवृंद तसेच पंच यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा कमालीचा उत्साह दिसून आला. स्पर्धेच्या वेळेपूर्वी अर्धातास अगोदरच विद्यार्थी केंद्रावर उपस्थित झाले. या स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या मोठी होती. दोन्ही केंद्रांवर परीक्षक व तेथील शिक्षण संस्थेचे संचालक आणि शिक्षकांनीही प्रतिसाद दिला.