जालना शहरात विविध ठिकाणी शोकसभा
By Admin | Updated: June 4, 2014 01:33 IST2014-06-04T01:11:28+5:302014-06-04T01:33:44+5:30
जालना : केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल त्यांना जालन्यात विविध ठिकाणी मंगळवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जालना शहरात विविध ठिकाणी शोकसभा
जालना : केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल त्यांना जालन्यात विविध ठिकाणी मंगळवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भाजपा कार्यालयात पक्षाच्या वतीने मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप तौर, माजी नगराध्यक्ष विलास नाईक, कृउबाचे उपसभापती रामेश्वर भांदरगे, मोहन बाहेकर, देवीदास देशमुख, सतीश जाधव, सुभाष पालवे, ज्ञानेश्वर शेजूळ, सिद्धीविनायक मुळे, राजू भालेराव आदींची उपस्थिती होती. शिवसेनेच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, पंडितराव भुतेकर, संतोष मोहिते, भाऊसाहेब घुगे, भानुदास घुगे, जगन्नाथ काकडे, गंगूबाई वानखेडे, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, अशोक पवार आदींची उपस्थिती होती. दुपारी भगवान सेवा मंगल कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, अर्जुनराव खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, डॉ. श्रीमंतराव मिसाळ, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, राजेंद्र राख, डॉ. संजय राख, प्रा. सत्संग मुंडे, जगत घुगे, गजानन नागरे, जगदीश नागरे, विठ्ठल जायभाये, राजू वाघ, रामकृष्ण फुंदे, सुनील सांगळे, संदीप बारगजे यांच्यासह तरूण कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी) आज जालना बंद जालना - केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे जालना शहरात ४ जून रोजी सर्वपक्षीय बंद पाळून मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. बुधवारी शहरातील व्यापार्यांच्या वतीने बंद पाळण्यात येणार आहे. ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोपीनाथ मुंडे यांना जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. जिल्हा व शहर व्यापारी महासंघाच्या वतीने ४ जून रोजी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला, शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, मराठवाडा चेंबर्स आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष किशोर अग्रवाल यांनी म्हटले आहे.