मोबाईल अॅप्सचा होतोय फायदा...!
By Admin | Updated: August 18, 2016 00:51 IST2016-08-18T00:33:18+5:302016-08-18T00:51:54+5:30
जालना : संगणक क्रांतीनंतर मोबाईल क्रांतीमुळे मोठे बदल होताना दिसत आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे हाताच्या बोटावर होत असल्याने अनेकांना नवल वाटते.

मोबाईल अॅप्सचा होतोय फायदा...!
जालना : संगणक क्रांतीनंतर मोबाईल क्रांतीमुळे मोठे बदल होताना दिसत आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे हाताच्या बोटावर होत असल्याने अनेकांना नवल वाटते. त्यातच बँका, विमा कंपन्या, महावितरण,मोबाईल कंपन्या, स्पर्धा परीक्षांची माहिती या अॅप्समुळे फायदा होण्यासोबतच कामे सुकर हात असल्याचे लोकमत सर्व्हेक्षणातून समोर आले.
बहुतांश स्मार्टफोनधारक मोबाईल बिल, वीज बिल, विमा पॉलिसी अथवा बँकांचे व्यवहार अॅप्सद्वारे करीत असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले. व्यवहार तात्काळ होण्यासोबतच वेळेची बचत होते. आपले खात्याची काय स्थिती आहे याची माहिती तात्काळ समोर येते. विशेष म्हणजे आपण पाहिजे त्या ठिकाणाहून ही कामे करता येत असल्याने अनेकांनी मोबाईल अॅप्सला महत्व दिले.
मोबाईल अॅप्स त्याचा उपयोग व दुरूपयोग यावर स्मार्टफोनधारकांच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून प्रतिक्रया जाणून घेण्यात आल्या. यात चार प्रश्न विचारण्यात आले. मोबाईल अॅप्समुळे कामे सुकर झाली का? यावर ४० टक्के नागरिकांना होय असे वाटते. ३० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर ३० टक्के नागरिकांना याबबत काहीच माहिती नाही. पण काहीवेळा आम्ही अॅप्स पाहत असल्याचे अनेकांनी सांगितले.
मोबाईल अॅप्समुळे कामे व्यवस्थित होतात का? यावर ३५ टक्के नागरिक होय म्हणतात. २५ टक्के नाही म्हणतात तर ४० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. काहींकडे स्मार्टफोन नसल्याचे अनेकांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी अॅप्स उपयोगी ठरत आहे का? यावर तरूणांनी प्रतिसाद देत ५० टक्के कौल दिला. ३० टक्के तरूणांना फायदा होत नसल्याचे वाटते. तर २० टक्के लोकांना याबाबत काहीच माहिती नाही. (प्रतिनिधी)