राजीव गांधी जीवनदायी आरोग्यदायी योजनेचा २० हजार रूग्णांना लाभ

By Admin | Updated: July 2, 2014 00:31 IST2014-07-01T23:59:26+5:302014-07-02T00:31:14+5:30

नांदेड : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यात २० हजार ५४५ रूग्णांनी लाभ घेतला असून जवळपास ३९ कोटी रूपये रूग्णालयांना अदा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली़

Benefits of 20,000 patients of Rajiv Gandhi Jeevandayi Healthy Yoga Scheme | राजीव गांधी जीवनदायी आरोग्यदायी योजनेचा २० हजार रूग्णांना लाभ

राजीव गांधी जीवनदायी आरोग्यदायी योजनेचा २० हजार रूग्णांना लाभ

नांदेड : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यात २० हजार ५४५ रूग्णांनी लाभ घेतला असून जवळपास ३९ कोटी रूपये रूग्णालयांना अदा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली़
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ऱ्हदय शस्त्रक्रियेसाठी १ हजार १७३ रूगांनी लाभ घेतला़ तर अतिदक्षता विभागात ४७५ रूग्णांनी, ऱ्हदयरोगासाठी १ हजार २०१ रूग्णांनी, कान, नाक, घसा शस्त्रक्रियेसाठी २ हजार ६१५ रूग्णांनी, पोटांच्या शस्त्रक्रियेसाठी ५१० रूग्णांनी, कॅन्सरच्या १ हजार ७ रूग्णांनी खिमोथेरेपीसाठी, कॅन्सरच्या ६९२ रूग्णांनी रेडिएशनसाठी, अस्थिरोग व अपघात विभत्तगात २ हजार २६० रूगणनंी, डायलेसिससाठी ५०० रूग्णांनी लाभ घेतला़ या योजनेअंतर्गत डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, लोटस हॉस्पिटल, आधार हॉस्पीटल, शिफा हॉस्पिटल, विनायक डायलेसिस सेंटर, अपेक्षा हॉस्पिटल, लव्हेकर हॉस्पिटल, वाडेकर हॉस्पिटल, नंदीग्राम हॉस्पिटल, उपजिल्हा रूग्णालय मुखेड आदी रूग्णालयांचा समावेश आहे़
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना प्रायोगिक तत्वावर नांदेडसह इतर सात जिल्ह्यात २ जुलै २०१२ पासून सुरू केली आहे़ या योजनेअंतर्गत पिवळी, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबाना दीड लाखापर्यंत निवडक ९७१ उपचार पद्धतीसाठी संबंधित रूग्णालयात नि:शुल्क उपचार करण्यात येत आहे़ २ जुलै रोजी या योजनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत़ या योजनेत लाभार्थी कुटुंबातील रूग्णास रूग्णालयाचा खर्च, औषधोपचाराचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च, रूग्णास दोन वेळा जेवण व परतीचा प्रवासाचा खर्च दिला जाते़
जीवनदायी आरोग्य योजनेच्या रूग्णालयामार्फत मागील दोन वर्षाच्या कालावधीत ३२५ आरोग्य शिबीरे घेण्यातत आली आहे़ त्या शिबीरात एकूण ५५ हजार २५२ रूग्णांची तपासणी करून ५ हजार ३१३ रूग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली असल्याचे योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ़ विलास गर्जे यांनी सांगितले़ या योजनेअंतर्गत लवकरच नवजात बालकांवर उपचार करणारे बाल रूग्णालयाचा समावेश करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Benefits of 20,000 patients of Rajiv Gandhi Jeevandayi Healthy Yoga Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.