शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

औरंगाबादमध्ये विशेष घटक योजनेत अचानक वाढले विहिरीचे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:43 IST

विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना विहीर खोदण्यासाठी आतापर्यंत १ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. तेव्हा एक लाखात विहिरीचे खोदकाम होत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेकडे कानाडोळा केला होता; परंतु मागील वर्षापासून हे अनुदान अडीच लाख रुपये झाल्याचे समजताच या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकर्‍यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत.

औरंगाबाद : विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना विहीर खोदण्यासाठी आतापर्यंत १ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. तेव्हा एक लाखात विहिरीचे खोदकाम होत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेकडे कानाडोळा केला होता; परंतु मागील वर्षापासून हे अनुदान अडीच लाख रुपये झाल्याचे समजताच या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकर्‍यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. तथापि, प्राप्त निधीतून मोजक्याच शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी कृषी विभागाने सोडत पद्धतीने विहिरींच्या अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकर्‍यांचा विकास होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पूर्वी जि.प.च्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. गेल्या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या नावे शासनाने सुधारित योजना आणली असून, अनुदानातही मोठी वाढ केली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकर्‍यांना नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. याशिवाय विहिरीसोबतच पंप संच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच (ठिबक अथवा तुषार) यासाठी एकत्रित अनुदान देण्यात येते. जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठीही ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची या योजनेत तरतूद आहे. 

मागील वर्षापर्यंत एका लाखामध्ये विहीर खोदण्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे मागासवर्गीय शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती. जि.प.च्या कृषी विभागाला विहिरीसाठी प्राप्त होणारा निधी अखर्चित राहत होता. ही बाब लक्षात घेता शासनाकडे अनुदान वाढवून देण्यासाठी अभ्यास समितीने शिफारस केली. त्यानुसार गेल्या आॅक्टोबरमध्ये  योजनेचे नाव बदलेले व अनुदानातही मोठी वाढ केली.  विहिरींसाठी १४ कोटींचा निधी प्राप्तयासंदर्भात कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार २,७०० अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी सुरू आहे. यंदा या योजनेसाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्राप्त अनुदानानुसार सोडत पद्धतीनेच विहीर व पूरक साहित्याचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादWaterपाणी