संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात

By Admin | Updated: October 29, 2016 00:59 IST2016-10-29T00:59:18+5:302016-10-29T00:59:18+5:30

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ या गरजू लाभार्थ्यांना निराधार योजनेचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.

Beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Yojna, in Diwali darkness | संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात

नायब तहसीलदारांना निवेदन : मानधन देण्याची मागणी
आर्वी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ या गरजू लाभार्थ्यांना निराधार योजनेचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. दिवाळी सणाला सुरुवात झाली असताना त्यांना मानधनापासून वंचित राहाव लागत असल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दिवाळी सणा साजरा करण्याच्या अनुषंगाने मानधन उपलब्ध करुन द्यावे, अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.
आर्वी तालुक्यातील संजय गांधीनिराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे मानधन हे दिवाळी सणाच्या तोंडावर मिळणे अपेक्षित होते. परंतु दिवाळीच्या सणाला सुरुवात झाल्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही. संजय गांधी निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी संबंधित लाभार्थी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना निधी बँकेत जमा केल्याचे सांगितले जाते. वृद्ध नागरिक बँकेत निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी जातोत. तेव्हा बँकेत निधीच नसल्याचे सांगितले जाते. यामुळे त्यांची घोर निराशा होते. मानधनाअभावी त्यांना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र सध्या बँकेत बघायला मिळत आहे. निराधारांचे मानधन त्वरित देण्याची मागणी नायब तहसीलदार मस्के यांना निवेदनातून निखील कडू, अरूण गेडाम, अशोक कठाणे, मंगेश ठाकरे, रोषन राऊत, निलेश गायकवाड, दिनेश डेहनकर, सतीश बरडे यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)

अनेक अडचणींचा सामना
उतार वयात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनांचाच आधारे आहे.त्यांचे सण याच योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनाच्या भरवशावर साजरे होतात.
दिवाळीसारखा सण असल्यामुळे हा सण साजरा करण्यासाठी निराधारांना मानधनाची गरज होती. मात्र दिवाळी सणाचा सर्वत्र झगमगाट असताना निराधार ज्येष्ठ नागरिकांना हा सण अंधारातच घालवाला लागत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Yojna, in Diwali darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.