शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

खंडपीठात शासनाकडून औरंगाबादच्या घनकचरा निर्मूलनावर कृती कार्यक्रम सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:33 IST

खंडपीठात सुनावणीदरम्यान राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या वतीने शहरात घनकचरा निर्मूलनासंदर्भात तात्कालिक आणि दीर्घकालीन, असे दोन्ही प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सादर करण्यात आले.

औरंगाबाद : गेल्या महिन्यापासून शहरात साठलेल्या कचर्‍याचा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या वतीने शहरात घनकचरा निर्मूलनासंदर्भात तात्कालिक आणि दीर्घकालीन, असे दोन्ही प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सादर करण्यात आले.खंडपीठाने दोन्ही शपथपत्रातील प्रत्येक मुद्यांवर सविस्तर खुलासा घेऊन अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेण्याकरिता मंगळवारी (दि.२७ मार्च रोजी) पुढील सुनावणी ठेवली आहे.  

राज्य शासनाचे शपथपत्रराज्य शासनाच्या वतीने नगरविकास खात्याचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शपथपत्र सादर केले. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार शहरात कचरा व्यवस्थापनासाठीचा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या भारत स्वच्छता अभियानाच्या नियमानुसार ८८ कोटी ८५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी ३१ कोटी ९ लाख रुपये केंद्र शासन देणार आहे. २० कोटी ७३ लाख रुपये राज्य शासन देणार आहे. तर ३७ कोटी २ लाख रुपये महापालिकेचा वाटा आहे, तोसुद्धा राज्य शासनच अदा करणार आहे. बुधवारी (दि.२१ मार्च) मुंबईला उच्चाधिकार समितीच्या झालेल्या बैठकीत औरंगाबाद महापालिकेच्या ‘डीपीआर’ला मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेने त्वरित काम करण्यासाठी राज्य शासनाने पहिला हप्ता म्हणून १० कोटी ३६ लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. 

महापालिकेने सादर केले शपथपत्रमहापालिकेने सादर केलेल्या शपथपत्रात कचरा व्यवस्थापनासाठीच्या निधीचा विनियोग कसा केला जाईल याची सविस्तर माहिती खंडपीठात सादर केली. त्यांनी नमूद केल्यानुसार सध्या शहरात रस्त्यावर साठलेला कचरा वेगळा करून ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणार आहे. यासाठी ३.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अल्प मुदतीसाठी सुका कचरा वेगळा करण्याकरिता ११.८३ कोटी रुपये, ओल्या कचर्‍यापासून झोननिहाय २७ ठिकाणी खत बनविण्यासाठी ९.५ कोटी, ८ ठिकाणी सुका कचरा वेगळा करण्यासाठी शेड उभारण्याकरिता ६३ लाख, कचर्‍याच्या गाठी बनविण्याचे ८ बेलिंग यंत्र खरेदीसाठी २५.६० लाख, श्रेडर आणि ग्रॅन्युलेटर यंत्र खरेदीसाठी १.३० कोटी, कायम प्रकल्प म्हणून बायोगॅसच्या दहा प्लँटसाठी १२ कोटी रुपये, प्रोसेसिंग शेडसाठी १५.५ कोटी, ३०० टन प्रतिदिवशी कचर्‍यावर प्रोसेसिंग प्लँटसाठी ७ कोटी, उर्वरित कचर्‍यावर शास्त्रीय प्रक्रि यासाठी ३ कोटी आणि नारेगावमध्ये साठलेल्या कचर्‍यावर शास्त्रीय प्रक्रियासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे मनपाने शपथपत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारGarbage Disposal Issueकचरा प्रश्नNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो