शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

९२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला साठ वर्षापूर्वी पैसे भरलेल्या सोसायटीत प्लॉट देण्याचा खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:49 PM

सोसायटीमधील भूखंडासाठी १९५८ साली १८०० रुपये सोसायटीकडे जमा केले होते.

औरंगाबाद : तब्बल साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९५८ साली पैसे भरूनही भूखंड न मिळालेले ज्येष्ठ नागरिक गजानन गंगाधर धारापूरकर (९२ वर्षे) यांच्याकरिता सन्मित्र को-आॅप. हौसिंग सोसायटीमधील भूखंड क्रमांक  १९, २० आणि २१ पैकी एक भूखंड (दिवाणी दावा क्रमांक ६९/१३ च्या निकालाच्या अधीन राहून) राखून ठेवावा तसेच त्यांना सहा आठवड्याच्या आत तात्पुरते भूखंड वाटपपत्र (प्रोव्हिजनल अ‍ॅलॉटमेंट लेटर) द्यावे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांनी दिला आहे. तसेच दिवाणी न्यायालयाने धारापूरकर यांच्या वयाचा विचार करून वरील दिवाणी दावा ३० जून २०१९ च्या आत निकाली काढावा, असेही या आदेशात म्हटले आहे. 

धारापूरकर यांनी सोसायटीमधील भूखंडासाठी १९५८ साली १८०० रुपये सोसायटीकडे जमा केले होते. मात्र, विविध न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांना अद्यापपर्यंत भूखंड मिळाला नाही. धारापूरकर यांनी सुरुवातीस सोसायटीविरुद्ध सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांचा दावा अंशत: मंजूर करून सोसायटीने धारापूरकर यांना भूखंड क्रमांक  १९, २० आणि २१ पैकी एक भूखंड द्यावा, असा आदेश २२ सप्टेंबर २०१४ रोजी दिला होता. 

या आदेशाविरुद्ध सोसायटीने सहकार अपीलीय न्यायालयात (अपेलेट कोर्ट) अपील दाखल केले असता वरील तीन भूखंडांबाबतचा दिवाणी दावा क्रमांक ६९/१३ च्या निकालाच्या अधीन राहून तीनपैकी एक भूखंड धारापूरकर यांना देण्याचा आदेश १७ आॅक्टोबर २०१६ रोजी दिला.  सोसायटीचे अध्यक्ष ए. यू. दिग्रसकर यांनी वरील निकालाविरुद्ध  खंडपीठात याचिका दाखल केली. वरील तीन भूखंडांचा वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यापैकी कोणताही भूखंड निकालापर्यंत धारापूरकर यांना देता येणार नाही, असे म्हणणे मांडले. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठRevenue Departmentमहसूल विभागAurangabadऔरंगाबाद