पैठण तालुक्यातील २८९ शाळांची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:08+5:302021-02-05T04:08:08+5:30
बुधवारपासून ५ ते ८ वर्गाच्या शाळा सुरू झाल्याने शिक्षक व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पैठण तालुक्यात २८९ शाळा ...

पैठण तालुक्यातील २८९ शाळांची घंटा वाजली
बुधवारपासून ५ ते ८ वर्गाच्या शाळा सुरू झाल्याने शिक्षक व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पैठण तालुक्यात २८९ शाळा असून शिक्षकांची संख्या १ हजार १३४ आहे. यापैकी १ हजार ९० शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून एक शिक्षिका कोविड पॉझिटिव्ह निघाली आहे. शाळेतील २७ हजार ९५५ विद्यार्थ्यांपैकी १० हजार २२ पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले आहे. बुधवारी पहिल्या दिवशी विविध शाळेत १० हजार २२ विद्यार्थी उपस्थित होते. अशी माहिती पंचायत समिती शिक्षण विभागातील सतीश आखेघावकर यांनी दिली.
कोट
विद्यार्थ्यांची भेट झाल्याने आनंद
आमचा विद्यार्थी आमच्या विद्या मंदिरातील देव आहे. तो भेटला याचा आनंद आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
- शुभांगी सदावर्ते, शिक्षिका.
कोट
नियमांचे पालन होत आहे
आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे वर्ग रचना, बैठक व्यवस्था व अध्यापन कार्य करत शाळा सुरू केल्या आहेत.
यावेळी कोविड नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे
-भास्कर कुलकर्णी, मुख्याध्यापक