शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुंडके छाटून खून केलेल्या तरुणाची ओळख पटली; खुनी कोण हे अद्याप रहस्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 20:18 IST

पोलिसांच्या शोधमोहिमेला यश आले असून आता खुन्याचा शोध सुरु आहे

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत चार दिवसांपूर्वी मुंडके छाटून खून करण्यात आलेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. अजय व्यंकटराव नीलवर्ण उर्फ देशमुख (२१,रा. मंगरुळ (पापट), ता. मानवत, जि. परभणी, ह.मु. रांजणगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.

अशी पटली खून झालेल्या तरुणाची ओळखरांजणगावात एक तरुण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. व्यंकटराव देशमुख या ट्रकचालकाचा मुलगा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मयत तरुणाचे फोटो दाखविले असता व्यंकटराव देशमुख व नीताबाई देशमुख या दोघांनी तो मुलगा आमचाच तीन-चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहा.आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेत मयताची ओळख पटविली. खून करण्यात आलेला अजय व त्याची आई हे एकाच कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. मृत अजय यापूर्वीही आठ-आठ दिवस घरीही येत नसल्याने आम्ही त्याचा शोध घेतला नसल्याचे अजय याचे वडील व्यंकटराव व आई नीताबाई यांनी पोलिसांना सांगितले.

मारेकऱ्याचा शोध सुरूअजयसोबत काम करणाऱ्या काही कामगारांची पोलिसांनी चौकशी केली. अजय यास दारूचे व्यसन होते. खून का व कोणी केला, याचे गूढ कायम आहे. पोलिसांची ५ पथके तपास करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी