लहरी निसर्गासमोर बळीराजा हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:24 IST2017-11-24T23:23:14+5:302017-11-24T23:24:16+5:30
यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत.

लहरी निसर्गासमोर बळीराजा हतबल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत. त्यांना साधा मोबाईल जरी चार्च करायचा असेल तर शहरी ठिकाणी यावे लागत आहे. अशी भयंकर स्थिती निर्माण झालेली असतानाही त्या गावांना अद्याप रोहित्र मिळालेले नाही. त्यातच भयंकर प्रश्न म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे तोंडाशी आलेला घासही जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे सोयाबीन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसाने जमिनीत ओल होती. शिवाय, अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसानेही पाणीपातळी या काळापर्यंत टिकून राहिली होती. त्यामुळेच यंदा रबीच्या क्षेत्रात कमालाची वाढ झाली होती. मात्र केवळ आणि केवळ वीजपुरवठा खंडित केल्यामुळेच शेतकºयांना विहिरीत असलेले पाणीही देता येत नसल्याचे भयंकर चित्र आहे. त्यामुळे शेतकरी ट्रक्टरवर डायनोमा तयार करुन तीन ते चार विद्युत मोटारी चालवित आहेत. तर बहुतांश शेतकरी डिझेल इंजिनने शेती भिजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वातावरणातील बदलामुळे तेही हाती लागते की नाही, याची शाश्वती नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : मागील ३ ते ४ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पिकांवर याचा परिणाम होत असून सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.
या हंगामात फक्त ५२ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे आतापासूनच जलस्तर घटत आहे. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत असल्याने या पिकांवर सेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. काही भागातील कापसावर घाटेअळीही लागली आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक हे सध्या कळी व फुल अवस्थेमध्ये आहे. या पिकांवर शेंगा पोखरणारी हिरवी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी ही अळी रोखण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी सांगितले. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत आहे. त्यामुळे कापसावर मोठ्या प्रमाणावर रोगराई पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभºयावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे व्यवस्थापन कसे कराव, याबाबत कृषी विभागाने पत्रके काढून शेतकºयांपर्यंत पोहाचवले आहे. सध्या रब्बीची पेरणी ८० ते ९० टक्के झाली आहे. काही गावात अजूनही गव्हाची पेरणी सुरू आहे. संरक्षित पाणी शेतकºयांनी खरीप व रबीच्या पिकांना देण्याचे आवाहन करण्यात आले. या हंगामात ५२ टक्केच पाऊस झाल्याने गव्हाची पेरणी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.