शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या घरांसाठी भीक मांगो आंदोलन; भिकेतील २ हजार रुपये जमा केले मुख्यमंत्री निधीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:45 IST

या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शहरातील फकीरही सहभागी झाले होते. फकिर का घर आमदार को दो अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

कन्नड (औरंगाबाद): सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या भीक मांगो आंदोलनाने शहर दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास सुरुवात झाली. शासकीय कार्यालये, गुत्तेदार तसेच सर्व सामन्यांकडे भीक मागितल्यावर पंचायत समिती प्रांगणात आंदोलनाची समाप्ती झाली. आंदोलनात राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील भीक मागो आंदोलन केले, यातून जमा झालेले १ हजार ९२३  रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आल्याची माहिती आहे. 

आमदार उदयसिंग राजपुत यांनी विधान सभेत अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदारांना मुंबईत घरे देण्याची आर्त मागणी केली. वास्तविक आमदार हा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करित असल्याने मतदार संघातील प्रश्न, गोर गरीब सर्व सामान्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असतांना आमदारांना मुंबईत घरे देण्याची मागणी करून मतदार संघाची बदनामी केली. त्यामुळे आमदाराची मुंबईतील घराची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अधिकारी, गुत्तेदार तसेच सर्व सामान्य जनतेकडे भीक मागण्यात येईल व त्यातून जमा होणारा पैसा विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला जाणार आहे. असे संतोष कोल्हे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगताना सांगितले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शहरातील फकीरही सहभागी झाले होते. फकिर का घर आमदार को दो अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

फाटके कपडे घालून हर्षवर्धन जाधवांनी मागितली भीकशहरात रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीनेही भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यात स्वत: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी फाटके कपडे घालून भीक मागितले. यात सर्व पक्षीय आमदारांना घरे देण्यासाठी भीक मांगून १ हजार ९२३ रुपयांचा मदत निधी जमा करण्यात आला. हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी तहसिल कार्यालयात जमा करण्यात आला. भिकेत मागितलेले पैसे राज्य सरकारने स्विकारले आहेत, असे उपरोधिकपणे हर्षवर्धन जाधव म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत इशा झा व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद