बीडमध्ये पुन्हा गुटखा पकडला

By Admin | Updated: July 29, 2015 00:51 IST2015-07-29T00:20:04+5:302015-07-29T00:51:09+5:30

बीड : शहरातील शाहूनगरमधील एका घरामध्ये १४ लाखांचा गुटखा पकडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या विशेष पथकाने

Beet caught a gutkha again | बीडमध्ये पुन्हा गुटखा पकडला

बीडमध्ये पुन्हा गुटखा पकडला

बीड : शहरातील शाहूनगरमधील एका घरामध्ये १४ लाखांचा गुटखा पकडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या विशेष पथकाने मंगळवारी झमझम कॉलनी परिसरात एका गोदामावर छापा टाकला. पथकाने तेथून सात पोते गुटखा ताब्यात घेतला आहे.
बीड शहरातील शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील झमझम कॉलनीतील एका गोदामात गुटखा असल्याची माहिती अधीक्षक पारसकर यांच्या पथकाला मंगळवारी मिळाली. वरिष्ठांना याची माहिती देऊन झमझम कॉलनी येथील गोदामावर दुपारी एकच्या सुमारास छापा टाकला. तेथे आढळलेल्या पोत्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याची बाब समोर आली आहे.
घटनास्थळावरून रिजवान खान शबीर खान यास अटक केली असल्याची पथकातील पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
झमझम कॉलनी भागात पोलिसांनी धाड टाकून गुटखा जप्त केला. याबाबत प्रभारी सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्याशी संपर्क साधला असता, याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Beet caught a gutkha again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.