बीडमध्ये दोन गटातील वादानंतर दगडफेक

By Admin | Updated: April 15, 2017 21:26 IST2017-04-15T21:23:56+5:302017-04-15T21:26:42+5:30

बीड : दोन गटातील वादानंतर झालेल्या दगडफेकीत वाद मिटवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी जखमी झाला

Beed has two groups, | बीडमध्ये दोन गटातील वादानंतर दगडफेक

बीडमध्ये दोन गटातील वादानंतर दगडफेक

बीड : दोन गटातील वादानंतर झालेल्या दगडफेकीत वाद मिटवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता गांधीनगर भागात घडली. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा नोंद झाला असून, एकास अटक केली आहे.
गांधीनगर भागात शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या भागात पेट्रोलिंग करणारे पेठ बीड ठाण्याचे पोलीस नाईक मुजावर शेख यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मद्यधुंद अवस्थेतील काही जणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात मुजावर शेख हे जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मुजावर यांच्या तक्रारीवरून सय्यद बख्तीयार उर्फ बक्कू मंजूर अली, सादेक शेख इस्माईल शेख, मुख्तार सय्यद मंजूर अली, अमजद शेख इस्माईल, मिर्झा शिफक बेग, कलीम उर्फ कल्लू अलीम शेख, रज्जाक हॉटेलवाला, बाळू उर्फ डंग्या जाधव, शंकर सर्जेराव जाधव, रूक्मीणीबाई शिवाजी जाधव व त्यांचा मुलगा (नाव अज्ञात) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बक्कू सय्यद याला अटक केली आहे. तपास निरीक्षक अनिलकुमार जाधव हे करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Beed has two groups,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.