बीड जिल्ह्याला ४ सुवर्णांसह १७ पदके

By Admin | Updated: January 18, 2015 00:31 IST2015-01-17T23:55:44+5:302015-01-18T00:31:10+5:30

बीड : जिल्हा जंपरोप संघटना, पूर्णवाद स्पोर्टस् अ‍ॅन्ड हेल्थ प्रमोशन अ‍ॅकॅडमी व क्रीडा भारती यांचे विद्यमाने व महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या अधिपत्याखाली

Beed district has 17 gold medals with 4 golds | बीड जिल्ह्याला ४ सुवर्णांसह १७ पदके

बीड जिल्ह्याला ४ सुवर्णांसह १७ पदके


बीड : जिल्हा जंपरोप संघटना, पूर्णवाद स्पोर्टस् अ‍ॅन्ड हेल्थ प्रमोशन अ‍ॅकॅडमी व क्रीडा भारती यांचे विद्यमाने व महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या अधिपत्याखाली व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेचे ७ वी सबज्युनीअर गट जम्परोप राज्य अजिंक्यपद स्पर्धा बीड येथे पार पडली. जिल्ह्याला चार सुवर्णांसह इतर १७ पदके मिळाली.
जिल्हा संघामध्ये सुभाषिणी वझे, राधिका वझे, मयुरी काळकुटे, अश्विनी रसाळ, साक्षी चौधरी, उत्कर्षा गिराम, पल्लवी दराडे, प्रतिक्षा आगलावे, मधुश्री चव्हाण,ऋतुजा व वैष्णवी बिक्कड, निकिता राजगुरू, प्रतिक्षा मांडवे, तेजश्री तांदळे, ऋतुजा मोरे, ऋतुजा नितल, स्रेहा राठोड, रूपाली करांडे, प्रीया हुंडेवाले, वैष्णवी घायाळ, शिवानी मस्कर, पूजा कोल्हे, प्रेरणा पिंपळे, नंदिनी ओव्हाळ, तनिष्का हंगे, पुष्कर्णी वझे, धोंडगे, उडाण, चादर, घोडके, यांच्यासह आनंद भालेराव, आकाश महाजन, ओंकार नागरगोजे, यश राठोड, आकाश राऊत, अभिषेक पाठक, ऋषीकेश साळुंके आदी खेळाडू सहभागी होते.
मुलांमध्ये कोल्हापूर प्रथम, लातूर द्वितीय तर सोलापूरने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये नागपूर प्रथम, बीड द्वितीय तर नाशिकने तृतीय क्रमांक मिळवला. (प्रतिनिधी)

Web Title: Beed district has 17 gold medals with 4 golds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.