बीड बायपास दोन तास जॅम

By Admin | Updated: May 13, 2016 00:17 IST2016-05-13T00:16:05+5:302016-05-13T00:17:42+5:30

औरंगाबाद : दुरुस्तीच्या कामामुळे एका बाजूचा रस्ता बंद केल्यामुळे गुरुवारी दुपारी बीड बायपासवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. तब्बल दोन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Beed bypass for two hours | बीड बायपास दोन तास जॅम

बीड बायपास दोन तास जॅम

औरंगाबाद : दुरुस्तीच्या कामामुळे एका बाजूचा रस्ता बंद केल्यामुळे गुरुवारी दुपारी बीड बायपासवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. तब्बल दोन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बीड बायपास रस्त्याची दुरवस्था झाली. ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दुपारी एक बाजू बंद करण्यात आली होती. त्यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत या रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी झाली. जड वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या.
ही कोंडी दुपारी २ वाजेपर्यंत कायम होती. तळपत्या उन्हात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली.
दरम्यान, सायंकाळीही देवळाई चौकापासून संग्रामनगरपर्यंत वाहनांची गती मंदावली होती, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

Web Title: Beed bypass for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.