जुन्या वादातून तरुणाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:02 IST2021-04-09T04:02:11+5:302021-04-09T04:02:11+5:30
=============== पत्नीचा पतीवर हल्ला औरंगाबाद : कामावरून घरी लवकर का आलात, असे विचारत पत्नीने पतीवर हल्ला केल्याची घटना हर्ष ...

जुन्या वादातून तरुणाला मारहाण
===============
पत्नीचा पतीवर हल्ला
औरंगाबाद : कामावरून घरी लवकर का आलात, असे विचारत पत्नीने पतीवर हल्ला केल्याची घटना हर्ष नगर येथे ६ एप्रिल रोजी रात्री झाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या मोहम्मद हनीफ मोहम्मद अनिस यांनी याविषयीची तक्रार पोलिसात दिली.
===================
मोबाईल चोरीचा अल्पवयीन मुलावर आरोप
औरंगाबाद : गजानन कॉलनी येथील संतोष काकाजी कावळे यांचे दोन मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी १५ वर्षाच्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना २ एप्रिल रोजी रात्री घडली.
====================
कापड दुकानदाराविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : कोविड संसर्गामुळे दुकाने उघडण्यास मनाई असताना कापड दुकान उघडणाऱ्या दुकानदाराविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदवला. धनंजय अण्णासाहेब सोनवणे असे दुकानदाराचे नाव असून, पोलीस हवालदार पंडित राजपूत यांनी बुधवारी रात्री सिडको एन ७ येथे ही कारवाई केली.
=============
दुचाकी चोरट्यांनी पळवली
औरंगाबाद : पंचवटी चौकाजवळ वाहनतळावर उभी करून ठेवलेली दुचाकी (एमएच २६ एफ ६८२६) चोरट्यांनी १ एप्रिल रोजी लंपास केली. याविषयी गजानन विद्याधर बोराळकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.