जुन्या वादातून तरुणाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:05 IST2021-04-04T04:05:42+5:302021-04-04T04:05:42+5:30
सुनील हरी खिल्लारे (२७,रा. न्यायनगर) यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संतोष थोरात, राजू गाडेकर, ...

जुन्या वादातून तरुणाला मारहाण
सुनील हरी खिल्लारे (२७,रा. न्यायनगर) यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संतोष थोरात, राजू गाडेकर, बिट्टू गाडेकर आणि संदीप पिंपळे यांचा आरोपीत समावेश आहे.
=============
चाकूसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात
औरंगाबाद : धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना गस्तीवरील पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. याप्रकरणी पोलीस शिपाई इमरान अत्तार यांनी सरकारतर्फे आरोपी अभिषेक विष्णू शिंदे आणि नितेश सुभाष चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.
=================
मुकुंदवाडीत दुचाकी चोरी
औरंगाबाद : मुकुंदवाडीतील देवगिरी बॅंकेसमोर उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. २७ मार्च रोजी झालेल्या या चोरीप्रकरणी दलसिंग शिवलाल शिहिरे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली.
====================
झन्ना मन्ना खेळणारे पकडले
औरंगाबाद : चिकलठाणा येथे एका पडक्या घरात झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या चार जणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी छापा टाकून पकडले. ३१ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. शहाबाज शब्बीर कुरेशी, नदीम नबी शेख, राम प्रल्हाद तांदळे आणि शेख सत्तार आणि रोहित अशोक पसलोटे अशी आरोपींची नावे आहेत.
=====================
विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा
औरंगाबाद : बुलेट मोटारसायकल खरेदीसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पती विजय अशोक रगडे, सासू , मावस सासू आणि मावस नणंद यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.