शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचा 'टँकरवाडा' कलंक पुसणार!; लातूर-नांदेडसाठी १२,४०० कोटींचा मेगा प्लॅन तयार

By बापू सोळुंके | Updated: March 20, 2026 18:48 IST

गोदावरीचे पाणी ८५ किमी पाईपलाईनने दुष्काळी भागात नेणार; १२,४०० कोटींचे ३ नवीन जलप्रकल्प प्रस्तावित,पाहा सविस्तर आराखडा

 

छत्रपती संभाजीनगर : नांदेड आणि लातूर जिल्ह्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने तीन नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.प्रत्येक प्रकल्पाची क्षमता ५० दलघमी आहे. या तीन प्रकल्पांसाठी सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपये गुंतवणूक होत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. मागील ५० वर्षांच्या कालावधीत केवळ १२ ते १५ वर्षेच मराठवाड्यात मुबलक पाऊस पडला आहे. उर्वरित कालावधीत कमी किंवा सामान्य पाऊस पडला आहे. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षी लातूर जिल्ह्यात कमी पावसामुळे गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मांजरा प्रकल्प कोरडा पडला होता. भूजल स्तर कमालीचा घटला होता. यामुळे लातूरकरांची तहान भागविण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत दरवर्षी अनेक गावांना टँकरद्वारेच पाणी पुरवावे लागते. यामुळे मराठवाड्याला टँकरवाडा, दुष्काळवाडा अशी दुषणे दिली जातात. यावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागाने नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी तीन प्रकल्प प्रस्तावित केले असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

असे आहेत प्रस्तावित तीन प्रकल्पनांदेड- अहमदपूर प्रकल्पनांदेडमधून वाहणाऱ्या गोदावरीचे तेलंगणात वाहून जाणारे ५० दलघमी पाणी वंकेश्वर बंधाऱ्याजवळ पंपहाऊसद्वारे उचलून ८५ किलोमीटरवरील दुष्काळग्रस्त अहमदपूर तालुक्यात नेणे. तेथील पेयजल आणि सिंचनासाठी याचा वापर करणे, यासाठी अहमदपूर तालुक्यात स्टोअरेज टँक बांधले जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ४ हजार ४०० कोटी रुपये.

नांदेड- लोहा प्रकल्पनांदेडमधील गोदावरी नदीचे वाहून जाणारे, पुराचे ५० दलघमी पाणी लोहा तालुक्यात नेऊन तेथील जनतेच्या पेयजल आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. याकरिता नांदेड येथून लोह्यापर्यंत सुमारे ८५ किमीची पाइपलाइन टाकली जाईल. या प्रकल्पाची किंमत सुमारे ४ हजार कोटी रुपये आहे.

मुळी बंधारा ते मांजरा खोरेलातूर जिल्ह्यातील मांजरा नदीचे खोरे हे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या खोऱ्यात पाणी उपलब्ध करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुळी बंधाऱ्यातून सुमारे ८५ किलोमीटर वरील मांजरा खोऱ्यात ५० दलघमी पाणी आणले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada to Erase 'Tanker Region' Tag: ₹12,400 Crore Water Plan

Web Summary : Nanded and Latur's water crisis may end with three projects worth ₹12,400 crore. Godavari's water will be diverted to drought-prone areas via pipelines and storage tanks, addressing drinking water and irrigation needs. This aims to remove the 'tanker region' stigma from Marathwada.
टॅग्स :godavariगोदावरीWaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ