शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बीडचा झेंडा कायम

By admin | Updated: June 9, 2015 00:20 IST

बीड : बारावी परीक्षेतील घवघवीत यशाची परंपरा दहावी परीक्षेतही बीडच्या विद्यार्थ्यांनी कायम राखली. ९५.०२ टक्के गुणांसह विक्रमी यश नोंदविताना

बीड : बारावी परीक्षेतील घवघवीत यशाची परंपरा दहावी परीक्षेतही बीडच्या विद्यार्थ्यांनी कायम राखली. ९५.०२ टक्के गुणांसह विक्रमी यश नोंदविताना दहावीच्या निकालातील दबदबा अबाधित राखला. औरंगाबाद विभागाच्या एकूण टक्क्यांपेक्षाही बीडने पाच टक्के गुण जादा घेत यशाचा आलेख उंच नेऊन ठेवला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१५ मध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बीड जिल्ह्यातील ३८ हजार ३३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ३८ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३६ हजार २०६ विद्यार्थी यशस्वी झाले. विशेष प्राविण्यासह (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) १२ हजार ७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १५ हजार ४५३, द्वितीय श्रेणीत ७ हजार १६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्या खालोखाल १०२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १ हजार ८९७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. बीड जिल्ह्याने मिळविलेले एकूण ९५.०२ टक्के गुण हे विभागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता होती. दुपारी १ वाजेनंतर मंडळाच्या वेबसाईडवर निकाल जाहीर झाला. अनेकांनी नेट कॅफे गाठून तर काहींनी मोबाईलवरुनच निकाल जाणून घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. पेढे वाटून आंनद साजरा केला. १०६२ ‘रिपीटर’ यशस्वी गतवर्षी अनुत्तीर्ण १५७० विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये पुन्हा परीक्षा दिली. १०६२ विद्यार्थी यशस्वी तर ५०८ पुन्हा अनुत्तीर्ण झाले. (प्रतिनिधी) परीक्षेस बसलेल्या ३८ हजार १०३ विद्यार्थ्यांमध्ये २२ हजार ५११ मुले व १५ हजार ५९२ मुलींचा समावेश आहे. ४त्यापैकी २१ हजार २५९ मुले व १४ हजार ९४७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची टक्केवारी ९४़४४ तर मुलींची टक्केवारी ९५़८६ टक्के इतकी आहे़ ४मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या.