बीडच्या पोरांची पुन्हा कमाल !
By Admin | Updated: June 3, 2014 00:44 IST2014-06-02T23:51:11+5:302014-06-03T00:44:16+5:30
बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली.

बीडच्या पोरांची पुन्हा कमाल !
बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली. यावर्षी बीड जिल्ह्याचा निकाल ९२.३६ टक्के इतका लागला़ ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या आहेत़ फेब्रुवारी २०१४ मध्ये बारावीच्या परीक्षा पार पडल्या.या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २७ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.३६ टक्के इतका आहे. विभागाच्या एकूण टक्केवारीपेक्षा बीडची टक्केवारी सर्वाधिक आहे. मुलीच ठरल्या भारी जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ११० मुले व ९ हजार ९२९ मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. मुलींची टक्केवारी ९४.०४ इतकी आहे. मुलांची टक्केवारी मात्र ९१.४० इतकीच आहे. विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल जिल्ह्याने घवघवीत यश संपादन करुन यशाची परंपरा कायम राखली. कला शाखेचा ८९.०९, वाणिज्य शाखेचा ९४.१९ तर विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल ९६.१३ टक्के इतका जाहीर झाला आहे. त्यामुळे विज्ञानमध्ये बीड जिल्ह्यातील मुले हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण बीड जिल्ह्यातील एकूण २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले़ जिल्ह्यात १६०९ मुली तर ६२९ मुलींचा त्यात समावेश आहे़ अनुत्तीर्ण होणार्यांत मुलांचीच संख्या जास्त आहे़ मुलींनी यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली. निकाल पाहण्यासाठी ठिकठिकाणच्या नेटकॅफेंवर गर्दी झाली होती. सकाळपासूनच अनेक परीक्षार्र्थींचे निकालाकडे लक्ष होते. उत्तीर्णांमध्ये आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी) गुणवत्ता यादीत लेकींचाच बोलबाला विभागाचा निकाल औरंगाबाद९१.२४ बीड९२.३६ परभणी८९.१२ जालना८९.८७ हिंगोली९०.७१ एकूण९०.९८ तालुका निहाय टक्केवारीपाटोदा ९३.०२ बीड ९४.२०आष्टी ९२.८१ गेवराई ९३.०२माजलगाव ८९.६६ अंबाजोगाई ८९.७९केज ९३.७४ वडवणी ९४.१८परळी ८७.८४ धारूर ८६.७६शिरूर ८६.७६