जलसाठ्याच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावीलोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:34 IST2017-09-05T00:34:04+5:302017-09-05T00:34:04+5:30
जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी ‘श्री’ चे विसर्जन होत आहे. यादरम्यान भाविकांनी विसर्जनस्थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्याच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जलसाठ्याच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावीलोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी ‘श्री’ चे विसर्जन होत आहे. यादरम्यान भाविकांनी विसर्जनस्थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्याच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्यात गोदावरी नदीची पाणीपातळी उंचावली आहे. त्याचवेळी जायकवाडी प्रकल्पही ८० टक्के आणि विष्णूपुरी प्रकल्प १०० टक्के भरला आहे.
विष्णूपुरीत पाण्याचा येवा सुरु झाल्यास अतिरिक्त जलसाठा या प्रकल्पाद्वारे केव्हाही विसर्जित केला जाऊ शकतो. या परिस्थितीत गणेशभक्तांनी ‘श्री’ मूर्तीचे विसर्जन सुरक्षितपणे करावेत. लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील गणेश मंडळानीही विसर्जनस्थळी सावधगिरी बाळगावी, विसर्जनावेळी खोल नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन केले आहे़