शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:50 IST

पुन्हा एकदा थंडीत वाढ; गरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र...

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा थंडी वाढू लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जातात. सकाळी अंघोळ करताना अनेकजण अतिगरम पाणी घेतात. मात्र, अतिगरम पाण्याने अंघोळ करणे, हे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे.

हृदयरुग्णांसाठी अतिगरम पाणी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हलक्या गार पाण्याने अंघोळ करणे किंवा शरीराचा तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तापमानाच्या मध्यम पातळीवरील पाणी वापरणे योग्य ठरते. गरम पाण्याने अंघोळ करीत असताना शरीराच्या सहनशक्तीचा विचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची अंघोळगरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र, अतिगरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.

स्नायू मोकळे होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतोगरम पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू सैल होतात. स्नायूच्या वेदना कमी होण्यासही मदत होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कडक पाणी, साबणाने अंग तडकतेकडक पाणी आणि साबणाने अंघोळ केल्यास हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा तडकण्याचाही प्रकार होतो. त्वचा संवेदनशील होऊन खाज येऊ शकते.

कडक पाण्याने अंघोळ केल्यासरक्तदाब वाढणे : कडक आणि थंड पाणी शरीरावर काहीसा शॉकसारखा परिणाम करते. थंड पाणी शरीराला तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी उत्तेजित करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि रक्तदाब वाढू शकतो.हृदयावर ताण वाढणे : थंड पाण्याने अंघोळ केल्याने हृदयाला अधिक मेहनत करावी लागते, कारण शरीराला तापमानाच्या बदलापासून वाचविण्यासाठी हृदयाला अधिक रक्तप्रवाहाची आवश्यकता असते. हे हृदयावर अतिरिक्त ताण आणू शकते.

हृदयरुग्णांनो, थंडीत ही काळजी घ्याथंडीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. उबदार कपडे परिधान करावे. रूम वार्मरचाही उपयोग करता येईल. अतिथंड, अतिगरम अन्नपदार्थ, पेय टाळले पाहिजे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाबाची औषधी नियमितपणे घ्यावी.

कोमट पाणी फायदेशीरथंड अथवा अतिगरम पाणी अंघोळीसाठी घेणे टाळावे. अंघोळीसाठी कोमट पाणी घेणे फायदेशीर राहते.- डाॅ. गणेश सपकाळ, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य