शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सावध व्हा ! कोरोनाबळींमध्ये वाढतेय २९ ते ५० वयोगटामधील रुग्णांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 2:40 PM

deaths in the age group of 29 to 50 years is increasing due to corona virus पॉझिटिव्ह येत असलेल्या तरुणांना कोरोनारूपी राक्षस मृत्युच्या दाढेत ओढत आहे.

ठळक मुद्देपूर्वी केवळ ज्येष्ठ नागरिकांचाच मृत्यू व्हायचा१ मार्चनंतर कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाचा नवीन स्ट्रेन मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीपर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ६० ते ८५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा होत होता. धक्कादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत २९ ते ५० वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकट्या औरंगाबाद शहरात तब्बल चौदा जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू सत्रामुळे आरोग्य यंत्रणाही पेचात पडली आहे.

१ मार्चनंतर कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी २०० ते २५० पॉझिटिव्ह रुग्ण, ५ ते ७ रुग्णांचा मृत्यू होत होता. ६ मार्चनंतर तर रुग्णसंख्या दहा पटीने वाढली. मृत्यू दररोज २५ ते ३० पर्यंत सुरू झाले. पॉझिटिव्ह आलेले ९० टक्के ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असायचे. त्यांच्यावर उपचार करताना आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत होती. ज्येष्ठांचे मृत्यू सत्र कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले नाही. आता त्यापेक्षाही आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पॉझिटिव्ह येत असलेल्या तरुणांना कोरोनारूपी राक्षस मृत्युच्या दाढेत ओढत आहे. ३ ते ८ एप्रिल या सहा दिवसांत अवघ्या औरंगाबाद शहरातील ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. २९ ते ५२ वयोगटांतील १६ जणांचा यात समावेश आहे. उपचाराला तरुणाई प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव आरोग्य यंत्रणेचा आहे.

मृत्युसत्र अतिशय गंभीरघाटी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये काही दिवसांमध्ये अत्यंत कमी वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू होतोय ही वस्तुस्थिती आहे. या मृत्यू मागची कारणे शोधण्याचे काम महापालिका आणि घाटी प्रशासन करीत आहे. तरुणाईचे मृत्युसत्र अतिशय गंभीर असून, काळजी घेणे हाच एकमेव उपाय सध्या आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

असे आहे सहा दिवसांतील मृत्युसत्र :तारीख - वय - रुग्णाचा पत्ता३ एप्रिल - ४४ - नित्यानंद पार्क, पडेगाव४ - ५० पेक्षा खालील एकाही नागरिकाचा मृत्यू नाही.५ - ३८ - जुना बाजार५- ४० - एकतानगर५- ४४ - चिकलठाणा५- ४४ - हडको एन- ११६ - ३१ - राजीव गांधीनगर६ - ३९ - हरसूल६- ५६ - भोईवाडा६- ५२ - चिकलठाणा७- २९- आसेफिया कॉलनी७ ४० - नारेगाव७ २५- एसटी कालनी, फाजलपुरा७ ४१ - उस्मानपुरा८ - ३५ - सातारा८ ४५ - सिडको

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद