शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! आता नाल्यात कचरा टाकल्यास दाखल होणार फौजदारी गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 12:45 IST

नालेसफाईसाठी पालिका दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च करत असताना काही बेजबाबदार नागरिक पुनःपुन्हा नाल्यात कचरा टाकतात. 

ठळक मुद्देनाल्यात कचरा टाकणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कक्षाला निर्देश अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात.

औरंगाबाद :  शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नाल्यांमध्ये कचरा टाकणे आता रहिवासी व व्यावसायिक आस्थापनांसाठी महागात पडणार आहे. २९ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिव्हिक रिस्पॉन्स टीमची नताशा झरीन, गौरी मिराशी आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे डेप्युटी सीईओ पुष्काळ शिवम उपस्थित होते. नालेसफाईसाठी पालिका दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च करत असताना काही बेजबाबदार नागरिक पुनःपुन्हा नाल्यात कचरा टाकतात. नालेसफाई करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीमध्ये मनपाला पैसा गुंतवावा लागतो.

हॉटेल्समधील उरलेले अन्नपदार्थ, घरगुती उत्पादकांद्वारे थर्माकोल आणि काही घरातील कचरा नाल्यात टाकण्यात येत असल्याने नाल्यातील पाण्यास विसर्ग होण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. नाल्यात कचरा टाकू नका, यासंदर्भात मनपाच्या वतीने जनजागृती करून कारवाई संदर्भात सूचना देण्यात आल्या. तरीही नागरिक दुर्लक्ष करत असल्याने रस्त्यावर, नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कक्षाला निर्देश दिले आहेत.

शहर स्वच्छ सर्वेक्षण  २०२१ ची तयारीनाल्यामध्ये तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर २९ नोव्हेंबरपासून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सध्या शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची तयारी सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी डिसेंबर महिना हा महत्वपूर्ण असतो. जनजागृतीहेतू डिसेंबर महिन्यात ‘लव्ह औरंगाबाद’ मोहिमेचा एक भाग म्हणून अनेक उपक्रमांचे नियोजनही करण्यात आले आहे. लव्ह औरंगाबाद मोहिमेमुळे रहिवासी आणि स्वच्छता कर्मचारी यांना कचर्‍याचे कोरडे, ओले आणि धोकादायक ठिकाणी विभाजन करण्यास प्रोत्साहित केल्याचे घनकचरा व्यवस्थापक नंदकुमार भोंबे यांनी सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका