शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरमध्ये भिशी घोटाळा; विश्वासाला तडा देऊन माय-लेकाने १६ कुटुंबांचे ३ कोटी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:23 IST

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेकांना भिशीच्या माध्यमातून अधिक परताव्याचे आमिष दाखवून माय-लेकाने १६ जणांची तब्बल २ कोटी ९९ लाख २० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नंदाबाई रमेश आधुडे (४५) आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (२१ दोघेही रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास, मूळ रा. घनसावंगी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी रविवारी दिली.

फिर्यादी जयश्री गजानन गिरी (रा. मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, बीड बायपास परिसरातील व्यंकटेश पार्क येथे राहणारी नंदाबाई रमेश आधुडे ही २०१४-१८ पासून भिशी चालवत होती. सुरुवातीला छोट्या रकमांच्या भिशी वेळेवर पूर्ण करून तिने महिलांचा विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने १२ लाखांची मोठी भिशी सुरू केली. जयश्री गिरी यांनी या भिशीत २० महिने दरमहा ५० हजार रुपये, याप्रमाणे १० लाख भरले. यापूर्वीचे १० लाख आणि हे १० लाख मिळून त्यांचे एकूण २० लाख रुपये नंदाबाईकडे जमा होते. २०१८ पासून ते जुलै २०२५ पर्यंत या माय-लेकांनी १६ हून अधिक लोकांकडून एकूण २ कोटी ९९ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, मुदत संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, गिरी यांच्यासह इतरांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास साहाय्यक निरीक्षक संजय बहुरे करत आहेत.

या लोकांची फसवणूकआरोपी माय-लेकाने जयश्री गिरी २० लाख, प्रकाश रणमोडे १४ लाख, नमिता बेंद्रे १७ लाख ५० हजार, विलास माने ३० लाख, नंदा बेंद्रे १५ लाख ५० हजार, चांद पठाण ८ लाख, सावित्री आघाव १९ लाख ८० हजार, ज्योती घोलप २ लाख ७० हजार, छाया चव्हाण ७ लाख ९० हजार, जिजा काळे ६ लाख ५० हजार, गुलाब राठोड १५ लाख ५० हजार, कमलबाई सुरसे २१ लाख ५० हजार, रंजना आघाव १६ लाख २० हजार, सपना मरकड ५० लाख, मीरा फलके ५० लाख, राम घायाळ ४ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यातील ६ लाख ९९ हजार ५०० ऑनलाइन तर २ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रोख नंदाबाई व सौरभकडे जमा केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ponzi Scheme: Mother-Son Duo Swindle ₹3 Crore, Betray Trust

Web Summary : A mother and son lured 16 families with a Ponzi scheme, defrauding them of ₹3 crore in Chhatrapati Sambhajinagar. They gained trust through smaller schemes, then defaulted on larger payouts. Police investigation is ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर