सावधान ! डेंग्यू पसरू लागलाय..!
By Admin | Updated: November 5, 2014 00:58 IST2014-11-05T00:33:14+5:302014-11-05T00:58:30+5:30
लातूर : डेंग्यू सदृश आजाराने जिल्ह्यात अनेकजण त्रस्त झाले आहेत़ गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढतच गेली़ लातूर शहरात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, डोकेदुखीचे रूग्ण आढळून येत आहेत़

सावधान ! डेंग्यू पसरू लागलाय..!
लातूर जिल्ह्यात डेंग्यूच्या आजाराने हळुहळू पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्य विभाग अजूनही सतर्क झालेले नाही. गेल्या दोन महिन्यांत शासकीय सर्वोपचार रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात हजारो रुग्णांनी उपचार घेतले आहेत. आजही जिल्ह्यात हजारो रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने २३ रक्तजल नमुने तपासणीसाठी नांदेडच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. मात्र अजूनही त्याचा अहवाल आला नसल्याने आरोग्य विभागाची सतर्कता लक्षात येत आहे. निलंगा, औसा, रेणापूर, चाकूर तालुक्यांत डेंग्यूसदृश आजार वाढत असल्याचे चित्र आहे.
लातूर : डेंग्यू सदृश आजाराने जिल्ह्यात अनेकजण त्रस्त झाले आहेत़ गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढतच गेली़ लातूर शहरात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, डोकेदुखीचे रूग्ण आढळून येत आहेत़ शहरातील विविध रूग्णालयात जवळपास १९ डेंग्युचे रूग्ण उपचार घेत आहेत़ रविवारी एका ९ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे़ जिल्ह्यातील अनेक गावांत तापीचे रूग्ण वाढले आहेत़ आरोग्य विभाग मात्र कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करीत आपली जबाबदारी झटकत असल्याने दिसून येत आहे़लातूर शहरातील अनेक भागात कचऱ्याची दुर्गंधी आहे़ शिवाय, गटारीची सफाईही केली जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे़ डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे वाढल्याने तापीने त्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे़ नळाला येणारे आठवड्यातून एक दिवस पाणी हे सुध्दा या आजाराचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे़ अचानकपणे ताप, डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे़ ग्रामीण भागातही तापीच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे़ खाजगी रूग्णालयात उपचार घेण्याऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे़ लातूर शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी भाजपाचे विजय क्षीरसागर, अॅड. प्रदीप मोरे, रामराव माने, स्मिता परचुरे, सुरेश राठोड, संजय सुरवसे यांनी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरात डेंग्यूने थैमान घातल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे.