५० हजार नेताना सावधान!
By Admin | Updated: September 19, 2014 00:12 IST2014-09-18T23:41:47+5:302014-09-19T00:12:41+5:30
कळमनुरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. प्रवासात बेहिशोबी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम नेल्यास सावधानकारक याचा हिशोब वाहन तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे.

५० हजार नेताना सावधान!
कळमनुरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. प्रवासात बेहिशोबी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम नेल्यास सावधानकारक याचा हिशोब वाहन तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे.
निवडणूक काळात पैशाची उलाढाल होवू नये, यासाठी प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी करण्यासाठी एसएसटी, एफएसटी ही पथके कार्यरत आहेत. पथक येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची तपासणी वारंगाफाटा, उमरा, गौळबाजार येथे केल्या जाणार आहे. ५० हजारापेक्षा जास्त बेहिशोबी रक्कम आढळल्यास इन्कम टॅक्सला याबाबत कळविल्या जाणार आहे. ५० हजारपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगल्यास ती रक्कम कोठून आणली, कोठे घेऊन जात आहात, बँकेचा तपशील आदींची माहिती तपासणी अधिकाऱ्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता बेहिशोबी ५० हजारापेक्षा जास्त रक्कम घेवून जाता येणार नाही, असे आढळल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविली जाईल. जास्त रकमेचा लेखा-जोखा तपासणाऱ्या पथकाला द्यावा लागणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी दिली.
कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
कळमनुरी : येथील तहसील कार्यालयात १८ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी मार्गदर्शन केले.
निवडणुकीसंदर्भात निर्माण केलेल्या ३५ टीमला अभिलेखे कसे ठेवून काम करायचे, याबाबत मार्गदर्शन केले. भरारी पथक, एफएसटी, एक खिडकी योजना यासह सर्वच ३५ पथकांच्या टिमला त्यांनी कोणकोणती कामे करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जागृती कशी करायची, निमंत्रण पत्रिका, अक्षता मतदारांना कशा वाटायच्या आदी माहिती देण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस अधिकारी व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला ६ क्षेत्रिय अधिकारी बैठकीला गैरहजर होते. गैरहजर क्षेत्रिय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसीचे खुलासे २४ तासांच्या आत सादर करावे अन्यथा कार्यवाही करण्याचा इशाराही नोटिसीत देण्यात आला आहे. या बैठकीला तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, शाम मदनूरकर, के.एम. विरकुंवर, व्ही.बी.सेवनकर, मधुकर खंडागळे, पोलीस उपाधिक्षक सुनील लांजेवार, पियूष जगताप, पोनि रविकांत सोनवणे,एल.डी. केंद्रे, पी.एस. कच्छवे, सुधाकर आडे, वहीद पठाण, वानखेडे, संग्राम सांगळे,शिवाजी पोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)