नगराध्यक्षपदासाठी केंद्रे-मुंडे यांच्यात लढत
By Admin | Updated: July 11, 2014 00:57 IST2014-07-11T00:14:44+5:302014-07-11T00:57:31+5:30
उद्धव चाटे , गंगाखेड येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत भरली आहे.शुक्रवारी ही निवडणूक होणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी केंद्रे-मुंडे यांच्यात लढत
उद्धव चाटे , गंगाखेड
येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत भरली आहे. शुक्रवारी ही निवडणूक होणार असून नगराध्यक्षपदासाठी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांचे दोन आणि जयश्रीताई मुंडे यांचे तीन असे पाच अर्ज दाखल झाले आहेत.
पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे आणि नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्यात नगराध्यक्षपद खेचून आणण्यासाठी स्पर्धा लागली आहे. ७ जुलै रोजी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी एकाच नावाने दोन अर्ज दाखल केले. तर याच दिवशी जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांनीही एकाच नावाने दोन अर्ज दाखल केले. ८ जुलै रोजी जयश्रीताई मुंडे यांनी आणखी एक अर्ज दाखल केला. हे पाचही अर्ज वैध ठरले असून नगराध्यक्षपदी कोण विराजमान होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने देखील काळजी घेत शहरातील बंदोबस्त वाढविला आहे.
आज फैसला
येथील नगराध्यक्षपदासाठी उर्मिलाताई केंद्रे आणि जयश्रीताई मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी दोन्ही गटात चढाओढ आहे.
पक्षीय स्थिती
या नगरपालिकेत एकूण २३ नगरसेवक आहेत. त्यात राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे ४, भाजप ५, शिवसेना २, घनदाट मित्रमंडळ १ आणि एक अपक्ष सदस्य आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मात्र पक्षीय गणित लावणे कठीण झाल्याने २९ मेपासून ही निवडणूक गाजत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी १० नगरसेवकांना पक्षाचा व्हीप काढला असून नगराध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.