शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दोन हजार विद्यार्थ्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 23:23 IST

परभणी : शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या वतीने जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ४३ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले

परभणी : शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या वतीने जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ४३ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले असून, या वसतिगृहाच्या माध्यमातून २ हजार १०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांचा लाभ होताना दिसत आहे.राज्यातील मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या मजुरांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातून कामगारही मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीसाठी जात असतात. तसेच जिल्ह्यात साखर कारखान्यावर बरेच कामगार अवलंबून आहेत. मजुरांससोबत त्यांची पाल्यही त्यांच्यासोबत जात होते. त्यामुळे या पाल्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत होता. शिक्षणात सातत्य राहत नसल्याने शाळाबाह्यमुलांच्या संख्येमध्ये वाढ होते. तसेच कामही हंगामी असल्याने काही पाल्यांना शाळेत जावेसे वाटले तरी या दरम्यानच्या काळात बराच अभ्यासक्रम वाया जात होता. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हंगामी निवासी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऊसतोड कामगारांचे पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळेमध्ये त्यांच्या निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने सुरू केलेले वसतिगृह या पाल्यांसाठी लाभदायक ठरताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये २०१५-१६ या वर्षामध्ये ४३ वसतिगृहांना मान्यता दिली असून यामध्ये २ हजार १०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पालम तालुक्यात रामपूर तांडा, रेवा तांडा, सिरसम, चाटोरी, लांडकवाडी, सोनेरी तांडा आशा ६ वसतिगृहांमध्ये २८० विद्यार्थी, मानवत तालुक्यात रामेटाकळी, किन्होळा बु., कोल्हा, कुंभारी तांडा, सारंगापूर, केकरजवळा अशा ६ वसतिगृहांमध्ये २३०, पाथरी तालुक्यातील बाबूलतार, देवनांद्रा ग्रामीण, मसला तांडा, कानसूर वस्ती, कानसूर, पाथरगव्हाण बु., कासापुरी, गुंज खूर्द अशा ८ वसतिगृहामध्ये ४६२ विद्यार्थी, परभणी तालुक्यात आमडापूर, ब्रह्मपुरी तांडा, विजयनगर तांडा, ताडलिमला अशा ४ वसतिगृहामध्ये १२७ विद्यार्थी, गंगाखेड तालुक्यातील सुप्पा तांडा, बोथी, बोथी तांडा, घटांग्रा, चंदू नाईक तांडा, थावरू नाईक तांडा, बडवणी, इसाद, बोर्डा, इरळद, गोदावरी तांडा, दामपुरी, देवकतवाडी, ढवळकेवाडी, पिंपळदरी, वरवंटी, धर्मापुरी तांडा, देवला नाईक तांडा, धारासूर तांडा अशा १९ वसतिगृहामध्ये १ हजार ५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ डिसेंबरपासून हे वसतिगृह सुरू झाले असून ३१ मार्चपर्यंत चालणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)