तुलसी विवाह पुरवणी जाहिरात मॅटर
By | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:29+5:302020-11-28T04:09:29+5:30
सध्या लग्नसराईमुळे नवरा- नवरीच्या कपड्यांपासून ते वऱ्हाडी मंडळींच्या खरेदीपर्यंत अनेक प्रकारचे कपडे द्वारकादास शामकुमार येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे बस्ता ...

तुलसी विवाह पुरवणी जाहिरात मॅटर
सध्या लग्नसराईमुळे नवरा- नवरीच्या कपड्यांपासून ते वऱ्हाडी मंडळींच्या खरेदीपर्यंत अनेक प्रकारचे कपडे द्वारकादास शामकुमार येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे बस्ता बांधण्यासाठीही अनेकांची पहिली पसंती द्वारकादास शामकुमार या शोरूमला मिळते आहे. या दालनामध्ये ठेवण्यात आलेला माल हा थेट मिलमधून येत असतो. दालनाची स्वत:ची मिल असल्यामुळे माफक दरात ग्राहकांना उच्च दर्जाचे कपडे खरेदी करण्याचा आनंद मिळतो.
खास लग्नासाठी कमीत कमी दरापासून ते जास्तीत जास्त किमतीच्या सर्वच रेंजच्या साड्या आणि पुरुषांचे कपडे दालनात ठेवण्यात आल्याचे दालनाचे संचालक नरेंद्र काबरा यांनी सांगितले. लग्नसराईमुळे पारंपरिक साड्या महिलांना आवडत आहेत तर डिजायनर लूकच्या साड्या तरुणींची पसंती बनत आहे. तसेच उत्तम दर्जाचे आणि लग्नकार्यात शोभून दिसतील असे विविध प्रकारचे ड्रेस मटेरिअल्स घेण्याकडेही तरुणींचा कल आहे. सुटिंग, शर्टिंग, शेरवानी, कुर्ता पायजमा असे पुरुषांचे कपडे घेण्यासाठीही द्वारकादास शामकुमार दालनात वर्दळ सुरू असल्याचे काबरा यांनी सांगितले.