बार्शी नाका पुलाला पुन्हा भगदाड
By Admin | Updated: July 28, 2016 01:02 IST2016-07-28T00:16:45+5:302016-07-28T01:02:44+5:30
बीड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बार्शी नाक्याजवळील पुलाला बुधवारी पुन्हा एकदा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून

बार्शी नाका पुलाला पुन्हा भगदाड
बीड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बार्शी नाक्याजवळील पुलाला बुधवारी पुन्हा एकदा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून हा खड्डा वाहनचालकांच्या जीवितास धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बार्शी नाका पुलाला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण काही सुटायला तयार नाही. हा पूल कालबाह्य झालेला आहे. त्यावर जागोजागी खड्डे पडलेले होते. एक खड्डा आरपार पडल्याचे बुधवारी सकाळी काही वाहनचालकांच्या निदर्शनास आले. या खड्ड्यातून बिंदूसरा नदीचा तळ दिसून येत असून गज उघडे पडले आहेत. याची माहिती वाहतूक पोलिसांना कळाली. वाहतूक शाखेचे निरीक्षक सोपानराव निघोट यांनी कर्मचाऱ्यांसमवेत तेथे धाव घेतली. खड्ड्याच्या शेजारी बॅरिकेट लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली. खड्ड्याबाबत खासगी कंपनीला तातडीने कळविण्यात आले आहे. खड्डा दुरूस्तीचे काम रात्रीतून होणार आहे. दुरुस्ती कामात अडथळा येऊ नये, यासाठी रात्री एकेरी वाहतूक केली जाईल, असे निघोट यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)