कॉँग्रेसजनांनी जाग्या केल्या बॅरिस्टरांच्या आठवणी
By Admin | Updated: December 4, 2014 00:52 IST2014-12-04T00:26:14+5:302014-12-04T00:52:19+5:30
जालना : ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या व्यक्तिमत्वासह कार्य पद्धतीची प्रेरणा घेऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जनकल्याणाची कामे करू

कॉँग्रेसजनांनी जाग्या केल्या बॅरिस्टरांच्या आठवणी
जालना : ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या व्यक्तिमत्वासह कार्य पद्धतीची प्रेरणा घेऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जनकल्याणाची कामे करून पक्ष बळकटीकरणाचे कार्य करावे, असे आवाहन जिल्हा कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी केले.
जिल्हा कॉँग्रेस समितीच्या कार्यालयात बुधवारी सकाळी ११.३० वाजता बॅ. अंतुले यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, ज्येष्ठ नेते फुलचंद भक्कड, चंद्रकला भक्कड, उपाध्यक्ष सदाशिवराव गाढे, बदर चाऊस, इकबाल कुरेशी, सोनाबाई निकाळजे, प्रभाकर निकाळजे, अशोक उबाळे, नगरसेवक अरुण मगरे, संजय भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी गोरंट्याल डोंगरे यांनी बॅ. अंतुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. गोरंट्याल म्हणाले की, बॅ. अंतुले यांच्यात तात्काळ निर्णय घेण्याची मोठी क्षमता होती. तसेच प्रत्येक निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची अजोड ताकद होती. त्यामुळेच अनेक कल्याणकारी योजनांची पायाभरणी त्यांच्या कारकिर्दीत झाली. विशेषत: अंतुले यांचा या जिल्ह्याच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे.
जिल्हाध्यक्ष डोंगरे म्हणाले की, अंतुले यांचे असामान्य व्यक्तिमत्व होते. केंद्रीय मंत्री म्हणून केलेले त्यांचे कार्य अजोड असेच आहे. त्यांनी जनकल्याणासाठी मोठे परिश्रम घेतले. त्यांच्या कामाची प्रेरणा घेवूनच आपण जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या अंतर्गत जनकल्याणाची कामे करुन पक्ष बळकट केला पाहिजे.
याप्रसंगी कॉँग्रेसचे पदाधिकारी मोहन इंगळे, ज्ञानेश्वर डुकरे, पिंटू रत्नपारखे, ज्ञानेश्वर उगले, संजय गायकवाड, ओम आडे, शे. अफरोज यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)