शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 8:10 PM

उत्पादनावर परिणाम, धान्यापाठोपाठ, भाज्यांची परपेठेवर मदार 

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील बरेलीची हिरवी मिरची, मध्यप्रदेशातील खांडव्याहून कोथिंबीर, हैदराबादची भेंडी व नाशिकमधून पालेभाज्या जाधववाडीतील अडत बाजारात आणण्यात येत आहेत. दुष्काळाने जिल्ह्यातील भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शहरवासीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी धान्यापाठोपाठ भाज्याही परपेठेतून आणल्या जात आहेत. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. याआधीही जिल्ह्यात दुष्काळ पडला होता; पण पालेभाज्या उगविण्यासाठी विहिरीत पाणी असत; पण आता विहिरींनी तळ गाठला आहे. गावागावांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. साहजिकच फळभाज्या व पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.  जाधववाडीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व पालेभाज्यांच्या अडत बाजारात परराज्यातून, परजिल्ह्यातून भाज्या आणल्या जात आहेत. येथील अडत व्यापारी राज्य, परराज्यातील अडत व्यापाऱ्यांच्या सतत मोबाईलवर संपर्कात आहेत.

जेथून भाज्या मिळतील तेथून आणून शहरवासीयांची गरज पूर्ण केली जात आहे. जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते की, येथून दिल्लीपर्यंत मिरच्या विक्रीसाठी पाठविल्या जात. मात्र, दुष्काळाने परराज्यातून हिरवी मिरची आणण्यास भाग पडत आहे. बरेली, रायपूर व नागपूर या भागांतून दररोज ५० ते ६० टन हिरव्या मिरच्या येत आहेत. होलसेलमध्ये ३० मार्चला १५ ते २० रुपये किलोने विक्री झालेली मिरची आज ४० ते ४५ रुपये किलोने विकली जात होती. किरकोळ विक्रीत तर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत हिरवी मिरची मिळत आहे, तर ढोबळी मिरची मालेगावहून आणली जात आहे. 

पहिल्यांदाच हैदराबादहून भेंडीची आवक होत आहे. शहरात भेंडीचा खप मोठ्या प्रमाणात आहे. दररोज ३० ते ४० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी लागते. शहराच्या आसपासच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर येत असे. आता खांडवा येथून ती येत आहे. भाजीमंडईत कोथिंबिरीची गड्डी १५ ते २० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागत आहे.  काकडी, पत्ताकोबी, सिमला मिरची, मेथी, पालक आदी भाज्या नाशिक, नगर जिल्ह्यांतून पुरवल्या जात आहेत. फक्त सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात आहे, तसेच उन्हाळी कांदाही बाजारात येणार आहे. यामुळे कांदा २५० ते ८५० रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. शहराच्या चोहोबाजूंच्या ५० कि.मी. परिसरातून लिंबाची आवक होत असते. आता ते अकोल्याहून आणले जात आहे. मागील महिन्यात ३० ते ४० रुपये किलो विक्री होणारा लिंबाचा भाव आता ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

वडापावमध्ये गुजरातचा बटाटा इंदूर व आग्रा हे बटाट्याचे गढ मानले जातात. शहरातही येथील बटाटा विक्रीसाठी येत असतो. मात्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशाला मागे टाकून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन झाले आहे. पहिल्यांदा शहरात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बटाटा येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश व गुजरात मिळून दररोज २० ट्रक (४०० टन) बटाटा येत आहे. गुजरातचा बटाटा ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल, तर उत्तर प्रदेशातील बटाटा ९०० ते १,१०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. वडापावमध्ये गुजरातचा बटाटा वापरला जात आहे, तसेच वेफर्ससाठीही बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीतून नाशिकपर्यंत बटाट्याचा ट्रक पाठविले जात आहे. -मुजीबशेठ, बटाट्याचे अडत व्यापारी

परपेठेतून आवक; महागाई आटोक्यात औरंगाबाद जिल्ह्यात फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. जर परपेठेतून भाज्या शहरात आणल्या नसत्या, तर पालेभाज्यांचे भाव २५ रुपयांपेक्षा अधिक, तर फळभाज्यांचा भाव १०० ते १५० रुपयांपर्यंत गेला असता. मात्र, परपेठेतून माल आणला जात असल्याने महागाई आटोक्यात आहे. -इलियास बागवान, फळभाज्यांचे अडत व्यापारी

टॅग्स :vegetableभाज्याAurangabadऔरंगाबादMarketबाजार